Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कलेसाठी आयुष्यभर विद्यार्थी दशेतच रहावे लागते-पंडित पांडुरंग मुखडे

कलेसाठी आयुष्यभर विद्यार्थी दशेतच रहावे लागते-पंडित पांडुरंग मुखडे

रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सतर्फे पंडित पांडुरंग मुखडे यांचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने गौरव

marathinews24.com

पुणे – तुम्ही गायक असा वा संगतकार; आपले काम चांगलेच झाले पाहिजे असा ध्यास असायला हवा. कलाकारांना साथसंगत करणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. गायन-वादनाची कला आत्मसात करण्यासाठी आयुष्यभर विद्यार्थी दशेतच रहावे लागते, असे मत ज्येष्ठ तबलावादक पंडित पांडुरंग मुखड यांनी व्यक्त केले.

स्पर्धा मार्गावरील सुरक्षिततेच्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सतर्फे पंडित मुखडे यांचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पुरस्काराचे वितरण रोटरी डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले यांच्या झाले. एसपीएम शाळेच्या आवारातील मुकबधीर विद्यालयातीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सचे अध्यक्ष ॲड. माधव सोमण, सचिव मधुर डोलारे मंचावर होते. नितीन मुळे, महानंदा मुखडे, विवेक दीक्षित आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मुखडे यांची मुलाखत मधुर डोलारे यांनी घेतली. ग्रामीण भागातील जीवन, घरातील परिस्थिती, मंदिरांमधील भजनांच्यावेळी पखवाज वादन करण्याची संधी मिळण्यासाठी सायकलवरून केलेला प्रवास येथपासून ते पुण्यात दिग्गज कलाकारांना तबला साथ करण्याची मिळालेली संधी याविषयी मुखडे यांनी सविस्तर माहिती दिली. शालेय जीवनात पंडित सदाशिवराव जाधव यांचे गायन ऐकून खूप प्रभावीत झालो होतो. त्यावेळी अशा गायकाबरोबर साथ करण्याची संधी मिळावी अशी मनोमन इच्छा होती. ती इच्छा बाळगून पुण्यात आलो त्यांची भेट घेतल्यानंतरचा सांगितीक प्रवास मुखडे यांनी उलगडला.

१९८९ साली अभिषेकीबुवांना तबला साथ करण्याची जी पहिल्यांदा संधी मिळाली त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही, अशी आठवण त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितली. सवाई गंधर्व महोत्सवात दिग्गज कलाकारांना केलीली साथ, पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे, विदुषी डॉ. प्रभा अत्रे यांना साथ करण्याची मिळालेली संधी याविषयीही त्यांनी आठवणी सांगितल्या.
प्रसाद गणपुले म्हणाले, कलाकार कलेसाठी आपले आयुष्य खर्ची घालतो, अशा कलाकारांचा पुरस्काराने केलेला गौरव कौतुकास्पद आहे.

प्रास्ताविकात ॲड. माधव सोमण म्हणाले, व्यावसायिक मूल्य आणि सामाजिक भान जपत केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार दिला जातो. पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘बाजे मुरलिया’ या गीतावर श्रद्धा मुखडे हिने कथक नृत्याविष्कर सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनमेजय खुर्जेकर यांनी केले तर आभार शुभांगी मुळे यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×