Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन

येरवडा कारागृहात अत्यवस्थ झाल्यानंतर ससूनमध्ये मृत्यू

marathinews24.com

पुणे – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जाेशी (वय ६३) यांचे शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. जोशी हे वर्षभरापासून कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. आजारपणामुळे त्यांनी जामीन मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सुनावणीपूर्वीच त्यांचे निधन झाले. ठेवीदारांची ५ कोटी ७३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक, सदाशिव पेठेतील निनाद नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक उदय जोशी, त्यांचा मुलगा मयुरेश यांच्यासह ७ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पुण्यात ‘ख्रिसमस पार्टी’ करण्याची बतावणी करुन शाळकरी मुलीचा विनयभंग – सविस्तर बातमी

सिंहगड रस्ता परिसरात गॅस वितरण एजन्सीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून जोशी यांच्या मुलाने अनेकांकडून पैसे घेतले होते. पैसे घेतल्यानंतर परतावा न दिल्याप्रकरणी विश्रामबाग ठाण्यात उदय जोशी, त्यांचा मुलगा यांच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात त्यांच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. सर्वोच्च न्यायालायने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर याप्रकरणी त्यांना अटक केली होती. जोशी यांच्या पत्नी शुभदा भाजप नगरसेविका होत्या. जोशी यांच्या आजार पणामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयात सादर केला होता.

‘जोशी हे गेेले काही दिवसांपासून आजारी होते. येरवडा कारागृहातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीखाली त्यांच्यावर कारागृहात उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. शुक्रवारी सकाळी जोशी यांना कारागृहात श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर कारागृह प्रशासनाने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.उपचारादरम्यान त्यांचे ससून रुग्णालयात निधन झाले. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे निश्चित कारण समजू शकेल’, अशी माहिती येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×