Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्या

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

3 कोटी 24 लाखांची रक्‍कम गोठवली

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्‍या बहाण्याने ज्‍येष्ठ नागरिकाच्‍या 22 कोटी 3 लाखांच्‍या फसवणूक प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी चौघांना बेड्या ठोकल्‍या आहेत. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्‍या आठ जणांच्‍या चौकशीत 3 कोटी 24 लाखांची रक्‍कम गोठविण्यात आली असल्‍याची माहिती सह पोलिस आयुक्‍त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस आयुक्‍त पंकज देशमुख, सायबर पोलिस ठाण्याच्‍या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे उपस्‍थित होत्‍या.

सायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडा – सविस्तर बातमी 

मुनीलकुमार सुरेंद्र सिंह (वय ५१, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे, लाला केशव उमाप (वय २६), परमेश्वर दिलीप दाभाडे (वय २३, तिघे रा. छत्रपती संभाजीनगर) यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्‍यांना 12 फेब्रुवारीपर्यात पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे. या चौघांच्‍या चौकशीत आणखी चौघांची नावे निष्पन्न झाली आहेत. साहिल जॉन श्रीसुंदर (22, रा. भिमनगर, भावसिंगपुरा, रमाबाई चौक, संभाजीनगर) याला सुरवातीला ताब्यात घेण्यात आले. त्‍याच्‍याकडे चौकशी केल्‍यानंतर त्‍यांच्‍या संपर्कात असलेलया विश्र्वजीत जनार्दन खंदारे (21, रा. भिमनगर, संभाजीनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्‍याच्‍या चौकशीत जनधन योजने अंतर्गत बँक खात्‍याचे किट व त्‍या एटीएम कार्ड पासबुक, इंटरनेट पासर्ड, युजरनेम हे अभिजीत शशिल नाडे (21, रा. संभाजीनगर) व दिशांत राजेंद्र कांबळे (22, रा. संभाजीनगर) यांना पुढे पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्‍यांना 16 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे मूळचे हरयाणातील आहे. पुण्यात त्यांची खासगी कंपनी होती. कंपनी विक्रीतून त्यांना रक्कम मिळाली होती. ही रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली. चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठविली. त्यानंतर त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यांनी सायबर चोरटे वापरत असलेल्या सात बँक खात्यात वेळोवेळी २२ कोटी तीन लाख रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांच्‍या मार्गदर्शनात सायबर पोलिसांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×