Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

सायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडा

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ड्रेनेज लाईन दुरूस्तीच्या नावाखाली एका सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांनी ‌तब्बल ६ कोटी ७० लाख रुपयांना गंडा घातला आहे. या घटनेने पुण्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात ६१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. याप्रकरणी संदिप चव्हाण, आदित्य चव्हाण, जितेन सोळंकी, शर्मा आणि राउत, बँक मॅनेजर, जज म्हणुन सांगणारा इसम, महाजन अशा नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अतिरिक्त संचालक पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या आईच्या नावे नवी पेठेत घर असून ते भाड्याने दिले आहे. भाडेकरूने त्यांना फोनद्वारे एक व्यक्ती घराच्या ड्रेनेजबाबत तपासणी केल्याची माहिती दिली. तसेच त्याच्याशी बोलण्यास सांगितले. त्याने त्याचे नाव संदिप चव्हाण सांगितले. सोसायटीची तक्रार असून सोसायटीने सांगितल्याने ड्रेनेजची तपासणीसाठी आलो असल्याची बतावणी केली. ड्रेनेजमध्ये झाडांची मुळे खोलवर गेली असल्यामुळे तुमच्या घरापासुन स्वतंत्र ड्रेनेजची लाईन मेन ड्रेनेज लाईनपर्यत टाकावी लागेल असे सांगितले. त्याने स्वतः महापालिकेचा अधिकारी असल्याची बतावणी केली.

तक्रारदारांनी हे काम करुन देण्याची तयारी दर्शविली. या कामासाठी ६५ हजार रुपये खर्च येईल तसेच साहित्य व मशिनरीचा खर्च वेगळा होईल असे सांगितले. त्यानुसार त्यांनी ६५ हजार रुपये त्याला ऑनलाईन पाठवून दिले. आरोपी चव्हाणने वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टींसाठी तसेच विविध विभागाचे चलन भरण्याचे कारण देत १५ लाख ५३ हजार ७०० रुपये,मशीन डीपॉझीटसाठी ९ लाख ९९ हजार तसेच वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचे चलन भरण्यासाठी आणखी ८ लाख ७६ हजार रुपये उकळले. आरोपीने त्यातील मशीन डिपॉझीट व चलनासाठी भरलेले पैसे हे थोडे कापून उरलेले पूर्ण पैसे परत मिळतील असे सांगितले होते. त्यानंतर फिर्यादीने प्रत्यक्ष जागेवर साहित्य आले आहे का, मशनरी आलेली आहे का? काम चालु झाले आहे का? याबाबत माहिती घेतली.

त्यावेळी या ठिकाणी कोणतेही काम सुरु नसल्याचे तसेच मशनरी किंवा साहित्य आलेसे नसल्याचे समजले. त्यांनी चव्हाणला फोन केला. त्यावेळी त्याने पुणे महानगरपालिकेने सोसायटीची पूर्ण ड्रेनेज लाईन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला हलवली असून फक्त शेवटचे पाईप जोडायचे बाकी आहेत, ते झाले की तुमचे काम सुरु होईल असे सांगितले.

काही दिवसांनी पाहणी केली असता कोणतेही काम सुरु नसल्याचे समोर आले. त्यांनी पुन्हा आरोपीला फोन केला असता त्याने आधी मशीन डीपॉझीट आणि चलनाचे पैसे परत देतो असे आश्वासन दिले. अडागळे नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून तो बँक ऑफ महाराष्ट्र पीएमसी ब्राँचमधून बोलतोय असे सांगत ६५ हजार परत पाठवीत असल्याची बतावणी केली. मात्र, त्यांना हे पैसे परत मिळाले नाही.

त्यानंतर पुन्हा फोनकरून पोलिस उपनिरीक्षक बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमचे काम संदिपला दिले होते. त्याने गोंधळ घातला आहे. त्याला पोलिस ठाण्यात आणले असून त्याने त्याचा वकील, त्याचा भाऊ आदित्य चव्हाणशी बोलण्यास सांगितले. आदित्य चव्हाण नाव सांगणाऱ्या व्यक्तीने इथुन पुढे संदिप चव्हाण तुमच्याशी बोलणार नाही मीच तुमच्याशी बोलेल आणि तुमचे डिपॉझीटचे पैसे परत मिळवुन देतो, असे सांगितले. नंतर आदित्य, अनिल चव्हाण (संदिप आणि आदित्यचे वडील), सोलंकी, शर्मा, कदम, राउत असे वेगवेगळया नावांनी सर्वजण फिर्यादीशी बोलत होते. त्यांना डिपॉझीट परत मिळण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगत भिती दाखवून पैसे पाठवायला सांगायचे.
तसेच न्यायाधीश बोलतोय असा एका आरोपीने फोन करून आदित्य व इतरांना दिलेले पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे ते पुन्हा मला भरावे लागणार असल्याचे सांगितले.

घाबरल्याने त्यांनी पुन्हा पैसे पाठविले. अशा प्रकारे त्यांच्याकडून ट्रान्सफर चार्जेस, सर्विस चार्ज, बँकेच्या खात्यामध्ये बॅलन्स मेन्टेन करणे, तसेच संदिप चव्हाणच्या मुलाचे ऑपरेशन, संदिप चव्हाणचा मुलगा वारला, राउतचा मुलगा वारला, जजची बायको वारली, आदित्यच्या मुलाचे ऑपरेशन असे कारणे सांगत ब्लॅकमेल करुन पैसे देण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून जून २०२५ पर्यंत ६ कोटी १६ लाख १३ हजार ३००६ कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपये उकळण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×