Breking News
Pune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले

कोथरूडमध्ये चौघांवर केला प्राणघातक हल्ला

कोंढव्यात दोन गटात भांडण, परस्परविरोधी गुन्हा

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कंपनी सोडल्यानंतर चार जणांवर जुन्या कंपनीने डाटा चोरीचा आरोप केला होता. त्याच्या चौकशीसाठी नाशिक येथून चौघे कोथरूड पोलिस ठाण्यात आले. जुन्या कंपनीचे लोक आणि चौघांमध्ये झालेल्या संभाषणानंतर त्यांच्यातील वाद मिटले होते. त्यानंतर पोलिस ठाण्यातून परत कारने जात असलेल्या चौघा तरुणांना वाटेत गाठून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
याबाबत संदीप कैलास लवाटे (२८, रा. गणेशनगर, मनमाड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पौड रोडवरील साई प्रतिष्ठान चौकात सोमवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमरास घडला.

मिटिंगमध्ये सोसायटीच्या सेक्रेटरीने रोखले मॅनेजरवर पिस्तुल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप लवाटे हे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांनी तेथे जाऊन फिर्याद घेतली. ते सध्या नाशिक येथील एका कंपनीत ४ महिन्यांपासून काम करत आहेत. यापूर्वी ते कोथरूड येथील एका कंपनीत नोकरीला होते. नाशिक येथील योगेश दुसाणे, प्रवीण गायकवाड, सचिन केदार हे सुद्धा पुण्यातील कंपनीत नोकरीस होते. मार्च २०२५ मध्ये लवाटे यांनी नोकरी सोडली. त्यांच्यासोबत योगेश दुसाणे, प्रविण गायकवाड व सचिन केदार यांनीही शहरातील कंपनी सोडून नाशिक येथील कंपनीत स्वीकारली. तर, योगेश दुसाणे यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. फिर्यादी व इतरांना कोथरूड पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

त्यानुसार ते २१ जुलै रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आले होते. त्यांच्यावर पूर्वीच्या कंपनीतील डेटा चोरून दुसऱ्या कंपनीला दिला म्हणून तक्रार केली होती. यावेळी कंपनीतील लोकही उपस्थित होते. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीचे समाधान झाले. त्यानंतर ते सर्व जण नाशिकला परत जात होते.

कारमधून ते साई प्रतिष्ठान चौकातील सिग्नलला थांबले होते. त्यावेळी एका दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर एकाने पुढे येऊन चालक योगेश दुसाने यांना बाहेर काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसर्याने फिर्यादी यांना कारमधून बाहेर ओढले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने धारदार हत्याराने डोक्यात मारले. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर त्याने योगेश दुसाने याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारून जखमी केले.

आणखी एकाने सचिन केदार आणि प्रवीण गायकवाड यांना कारमधून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ते पळून गेले. त्यातील एका जणाला फिर्यादी यांनी ओळखले असून तो पूर्वीच्या नोकरीला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×