Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात विक्रीसाठी आणलेली ४ पिस्टल जप्त; तस्कराला अटक

पुण्यात विक्रीसाठी आणलेली ४ पिस्टल जप्त; तस्कराला अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – गावठी पिस्तुलांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्कराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्याच्याकडून ४ गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, मॅगझिन असा दोन लाखांचा शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणी पथकाने भुषण उत्तम मोहिते (वय २३) याला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या तीन घटना – सविस्तर बातमी 

शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणारे, फरारी, तडीपार, रेकॉर्डवरील आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार २७ जुलैला खंडणी विरोधी पथक एक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सचिन माळवे, सोमनाथ कांबळे, दयानंद तेलंगे पाटील यांना गोकुळनगर, नऱ्हे येथे एकजण गावठी पिस्टल विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे तीन ते चार पिस्टल आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सागडे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून नऱ्हे परिसरातून भुषण उत्तम मोहिते याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता चार गावठी पिस्टल, त्यांची मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

चौकशीदरम्यान आरोपीने ही पिस्टले महेश कांबळे (रा. गुजरवाडी, पुणे) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
याप्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सागडे, पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस अंमलदार रणजित फडतरे, रहिम शेख, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब दांगडे, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, प्रमोद पवार, किरण मोरे, सुहास जगताप यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×