Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या तीन घटना

पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या तीन घटना

चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन् तिहेरी तलाकचा आरोप

marathinews24.com

पुणे – शहरातील नांदेड सिटी आणि काळेपडळ पोलिस ठाण्यांत महिलांच्या छळाचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणे, माहेराहून पैसे, फर्निचर व दागिने आणण्यासाठी दबाव टाकणे, मानसिक छळ करणे तसेच तिहेरी तलाक उच्चारल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये पीडित महिलांनी दीर्घकाळ अत्याचार सहन केल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली आहे.

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने गंडा, १२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

नांदेड सिटी पोलिस ठाण्यात २७ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, परसराम अंकुश सोनटक्के (वय ३४, रा. घारे कॉलनी, मंठा, जि. जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर सन २०१४ ते मे २०२६ या कालावधीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात आली. तसेच घर आणि व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

काळेपडळ पोलिस ठाण्यातील पहिल्या प्रकरणात २९ वर्षीय विवाहितेने रेनॉल्ड बेंजामिन फ्रान्सिस (वय ३६) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. २८ जानेवारी २०१८ ते जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने कोणतेही ठोस कारण नसताना पत्नीला वारंवार मारहाण केली, चारित्र्यावर संशय घेत अपशब्द वापरले आणि सातत्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

काळेपडळ पोलिस ठाण्यातील दुसऱ्या प्रकरणात ३१ वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीवरून अब्दुल्ला रेजा अहमद शेख, रेजा अहमद शेख, खतीजा रेजा अहमद शेख आणि सानिया सईम सय्यद (सर्व रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० जुलै २०२० ते १७ जुलै २०२६ या कालावधीत माहेराहून फर्निचर, पैसे, सोन्याचे दागिने आणण्याची मागणी करण्यात आली. तसेच वडिलांचा फ्लॅट पतीच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत मारहाण केल्याचा आरोप आहे. तिहेरी तलाकला कायद्याने बंदी असतानाही पतीने तीन वेळा ‘तलाक’ उच्चारून विवाह संपुष्टात आणल्याचे सांगत धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणांचा संबंधित पोलिस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×