Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने गंडा, १२ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात

फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल १२ लाख १५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १२ फेबु्रवारी ते १७ जुलै २०२६ कालावधीत येवलेवाडीत घडली आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरूणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाला ट्रेडींग करणे भोवले, १० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे येवलेवाडीत राहायला असून, १२ फेबु्रवारीला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर त्यांना बनावट ट्रेडिंगचे स्क्रीनशॉट पाठवून विश्वास संपादित केला. सायबर चोरट्यांनी तरूणाकडून १२ लाख १५ हजार रूपये ऑनलाईनरित्या स्वीकारले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करीत आहेत.

हडपसरमध्ये भरदिवसा घरफोडी, दागिने चोरीला

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २७ जुलैला सकाळी अकराच्या सुमारास हडपसरमधील बिराजदार नगरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटूंबियासह हडपसरमधील बिराजदारनगरात राहायला आहेत.२७ जुलैला त्यांचे घर बंद असल्याची संधी साधली. घराचे कुलूप तोडून आतमधील एक लाखांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक साठे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×