कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १० लाखांची फसवणूक

बनावट फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली घातला गंडा

marathinews24.com

पुणे – बँकांकडून कर्ज न मिळाल्याने मित्राच्या शब्दांवर विश्वास ठेवून तरुणाने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. परंतु कर्जाच्या नावाखाली बनावट फायनान्स कंपनीने त्याची १० लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना पुण्यातील कोथरूड परिसरात घडली असून, याप्रकरणा तीन आरोपींविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी सुशील बोडखे याच्यासह मनीषा बनसोडे आणि पुनित नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या  : आत्महत्यास प्रवृत्ती केल्या प्रकरण दोघांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडजवळ भुगाव-बावधन भागात राहणारा आणि कोलते पाटील डेव्हलपर्समध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून संदीप भरत जरांडे कामाला आहे. त्याचा शाळेतील मित्र सुशील बोडखे याच्याशी त्याची जुनी ओळख होती. सप्टेंबर २०२४ मध्ये, जेव्हा त्याला ३५ लाख रुपयांच्या कर्जाची आवश्यकता होती.

त्यावेळी त्याचा सीबिल स्कोअर खराब असल्याने बँकेकडून कर्ज मिळू शकले नाही. तेव्हा त्याने सुशीलशी संपर्क साधला असता, त्याने आयडी फायनान्स आणि श्री विनायक फायनान्स द्वारे अनेक लोकांनी कर्ज घेतले आहे. त्याच्या ओळखीच्या मनीषा बनसोडे आणि पुनीत तेथे आहेत, जे फाइल पास करून देतात. त्याच्यावर विश्वास ठेउन संदीपने आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासबुकची छायाप्रत सुशीलला दिली. त्यासाठी ५० हजार रूपये रोख स्वरूपात सुशीलला दिले.

महिन्यानंतर संदीपने पाठपुरावा केला तेव्हा, सुशीलने सांगितले की बँक अधिकारी रजेवर असल्याचे सांगितले. ११ डिसेंबर २०२४ रोजी सुशीलने पुन्हा संदीपकडून १० हजार रूपये फोन पे नंबर घेतले. त्यानंतर आरोपी सुशीलने श्री विनायक फायनान्स नावाच्या बनावट कंपनीच्या पासबुकचा फोटो पाठवला.

त्यानंतरही त्याने फाइल प्रोसेसिंगच्या नावाखाली ४० हजार रूपये घेतले. २४ सप्टेंबर २०२४ ते १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संदीपकडून वेगवेगळ्या प्रकारे ८ लाख ३३ हजार रूपयांची फसवणूक केली. कधी गॅरेंटर लोनच्या नावाखाली, कधी ओव्हरड्राफ्ट अकाउंटच्या नावाखाली तर कधी फाइल चार्जेसच्या नावाखाली. ही रक्कम कधी फोन पे द्वारे रक्कम आरोपींनी स्वीकारली आहे.

आरोपीने फोन पे नंबरद्वारे संदीपच्या काका आणि नातेवाईकांकडून १ लाख ९९ हजार रूपये वसूल केले. संदीपने याप्रकरणी तक्रार दाखल करीत सर्व बँक स्टेटमेंट्स आणि फोन पे व्यवहारांच्या प्रतीही पोलिसांना सादर केल्या. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संदीपला ईमेल आला होता. ज्यामध्ये त्याला ३५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. नंतर मनीषा बनसोडे यांनी १५ फेब्रुवारीला पुन्हा ईमेल केला आणि विमा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २९ हजार २८९ रुपये जमा करण्यास सांगितले. परंतु जेव्हा संदीपने कर्जाची अंतिम मंजुरी किंवा चेकची मागणी केली तेव्हा सुशीलने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर, संदीपने ईमेल आणि पासबुक पाहिले तेव्हा त्यावर कोणत्याही खर्‍या कंपनीचा लोगो नव्हता.

कोणतीही अधिकृत डिजिटल स्वाक्षरी नव्हती. नंतर असे आढळून आले की आयडी फायनान्स आणि श्री विनायक फायनान्स नावाची कोणतीही अधिकृत वित्त संस्था अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले. आरोपींनी संदीपची १० लाख ४८ हजार ५५१ रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक चेतन धनावडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×