Breking News
Warje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहाच्या आमिषाने फसवणूक; युवतीची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पतीशी पटत नसल्याने माहेरी येऊन राहिलेल्या विवाहितेशी लग्न करण्यास नकार दिल्याने व धमकावल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरवडा कारागृहात वृक्षारोपण – सविस्तर बातमी

दिपाली जाधव (वय २९, रा. आण्णाभाऊ साठे वसाहत, सिंहगड रोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ अभिजित सुधाकर भोसले (२३, रा. शाहुनगर, श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तुषार दादा कांबळे (रा. बावडा, ता. इंदापूर) आणि प्रवीण रामचंद्र चोपडे (रा. आकुर्डी खंडोबा माळ मंदिरासमोर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अण्णाभाऊ साठे वसाहतीत २६ मे २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली जाधव ही फिर्यादी यांची बहीण असून दीपालीचा विवाह झाला होता. पतीशी पटत नसल्याने ती गेल्या ६-७ महिन्यांपासून आईकडे आण्णाभाऊ साठे वसाहतीत राहत होती. या दरम्यान तिचे तुषार कांबळे याच्याशी संबंध जुळले. तिने तुषारकडे लग्नाचा आग्रह केला. त्याला त्याने नकार दिला. तसेच प्रवीण चोपडेने तिला आदल्या दिवशी फोन करुन धमकावले होते.

त्यामुळे नैराश्येतून दीपाली जाधव हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नामदे तपास करीत करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×