Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

२७ दुचाकी जप्त; पारगाव कारखाना पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मौजमजा करण्यासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीला पारगाव कारखाना पोलिसांनी अटक केली आहे. टोळीकडून तब्बल २७ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून, १६ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या तुलनेत मागील काही वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. रितेश फकीरा रोकडे ( वय १८, रा. चांडोह शिरूर) हर्षद जालींदर ढवळे ( वय २१, रा. फाकटे) आणि प्रथमेश दत्तात्रय ढवळे (वय १९, रा. फाकटे शिरूर) अशी अटक केलेल्या टोळीची नावे आहेत.

डिजिटल पुराव्यांचे पेन ड्राईव्ह सर्व आरोपींना कोर्टाचे आदेश – सविस्तर बातमी 

जारकरवाडी परिसरात जिल्हा परिषद शाळेसमोरील दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना २५ डिसेंबर रात्री घडली होती. चोरीप्रकरणी पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून रितेश रोकडे, हर्षद ढवळे, प्रथमेश ढवळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी जिल्ह्यासह इतर ठिकाणी वाहन चोरीचे गुन्हे केले असल्याचे तपासात उघडकीस आले. टोळीकडून तब्बल २७ दुचाकी जप्त केल्या आहेत.

वाहन चोर टोळीने पारगाव (कारखाना), शिक्रापूर, लोणीकंद, वाघोली, रामानंद तसेच संगमनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मिळून १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. मौजमजा करण्यासाठी दुचाकीची चोरी करून विक्री करत असल्याचे टोळक्याने कबुल केले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नेताजी गंधारे, उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अविनाश कालेकर, संजय साळवे, चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग, सचिन डामसे, अमोल वडेकर, शंतनू सांगडे, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, राजेंद्र उतळे, निशा गुळवे, गजानन डाके, यशवंत साबळे, संदीप बोराडे, शितल पोखरकर, सुजाता जाधव, काजल फलके पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, प्रदिप बढेकर, अश्पाक शेख, संदीप घुले यांनी केली.

वाहन चोरी करणाऱ्या टोळीला पारगाव कारखाना पोलिसांनी अटक करीत चोरीचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. टोळीकडून तब्बल २७ दुचाकी जप्त केल्या असून, आणखी तपास केला जात आहे. नागरिकांनो आपली वाहने पार्किंग करत असताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. संशयित व्यक्तीची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी.

संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×