Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

आदिवासी मन्नेरवारलु महासंघाच्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी गंगाधर तोटलोड यांची नियुक्ती

आदिवासी मन्नेरवारलु महासंघाच्या धर्माबाद तालुकाध्यक्षपदी गंगाधर तोटलोड यांची नियुक्ती

समाजहितातील कार्याची दखल घेत महासंघाचा सन्मान

marathinews24.com

नांदेड – आदिवासी मन्नेरवारलु समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व संवैधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी मन्नेरवारलु महासंघाने माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर यादवराव तोटलोड यांची धर्माबाद तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार – सविस्तर बातमी 

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण (अण्णा) जेठेवाड यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून सत्कार केले. या वेळेस संघटनातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आज पर्यंत समाजहितासाठी केलेले निःस्वार्थ कार्य, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि संघटन कौशल्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

समाजातील गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणारे, विश्वास, आपुलकी, मैत्री भाव यांचा सुंदर संगम असलेले गंगाधर तोटलोड हे जनसामान्यांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होत विकासकामांद्वारे समाजहित जपण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

या नियुक्तीमुळे धर्माबाद तालुक्यात आदिवासी मन्नेरवारलु समाजाचे संघटन अधिक बळकट होईल, समाजातील कष्टकरी कामगार वर्ग, युवक, महिला, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य घटकांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करता येईल, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे. तसेच यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात समाज निश्चितच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असे मत ओमप्रकाश आदमवाड यांनी मांडले.

या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून तोटलोड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×