पुण्यात गांजा तस्करांना बेड्या; ७२ किलो गांजासह चौघे जाळ्यात

गुन्हे शाखेच्या युनिट सातने केला पर्दाफाश

marathinews24.com

पुणे – शहरात गांजा तस्करांच्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट सातने पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून तब्बल ७२ किलो गांजा, मोटार असा १९ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. भिवा कालिदास वाघमोडे (वय ३६), विष्णु भागवत वाघमोडे ( वय २८) हरि श्रीपती ढवळे (वय ३२) मनोज अनिल सुरवसे (वय २९ सर्व रा. करमाळा जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ट्रॅक्टर अनुदानासाठी लाचेची मागणी – सविस्तर बातमी

गुन्हे शाखा युनिट सातचे पथक १३ मार्चला गस्त घालत असताना पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांना गांजा तस्करांची माहिती मिळाली. खात्रीशीर माहिती मिळाली. ते कारमधून पुण्यात गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. केसनंद वाडेबोल्हाई रोडलगत बोल्हाईमाता मंदिराजवळ पोलिसांनी कार अडवून झडती घेतली. डिकीत चार पोत्यांमध्ये ५८ किलो गांजा मिळून आला. मुख्य आरोपी भिवा वाघमोडे याच्या घरातून आणखी १४ किलो गांजा जप्त केला. एकूण ७२ किलो गांजा जप्त केला आहे.

अटक केलेल्या आरोपींनी विक्रीसाठी गांजा आणल्याची कबुली दिली. त्यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. टोळीमागील मोठ्या रॅकेटचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, एपीआय मदन कांबळे, सारंग दळे, ऋषीकेश ताकवणे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे महिला पोलीस अंमलदार नेहा तापकीर, सोनाली नरवडे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×