Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

प्रेयसी मृतावस्थेत; प्रियकराची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

प्रेयसी मृतावस्थेत; प्रियकराची रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

येरवडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – शहरातील नामांकित रुग्णालयात कामाला असलेल्या एका परिचारिकेचा मृतदेह प्रियकराच्या खोलीत आढळून आला आहे. तर प्रियकराने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही घटनेमुळे खळबळ उडाली असून, खून करून प्रियकराने आत्महत्या केली का, यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची ४७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

दिव्या निघोटे (वय २३, रा. लोणीकंद) असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणीचे नाव आहे. तर गणेश शाहूराव काळे (वय २७, रा. संगमवाडी; मूळ रा. अशोक नगर, ढगे कॉलनी, बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश काळे हा मूळचा बीड जिल्ह्यातील होता. गेल्या काही वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. प्रेयसी दिव्या ही लोणीकंद भागात राहणारी होती. गणेश आणि दिव्या हे दोघेही बंडगार्डन भागातील नामांकित रुग्णालयात कार्यरत होते. गणेश हा लॅब टेक्निशियन आणि दिव्या परिचारिका म्हणून नोकरी करत होती. दोघांचे लग्न ठरणार होते; मात्र दिव्याच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. शनिवारी दिव्याने कुटुंबीयांना “मी मैत्रिणीसोबत बाहेर जाते असे म्हणत घर सोडले; पण ती परत आली नाही.

याप्रकरणी दिव्याच्या कुटुंबीयांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदवली होती. तर रविवारी (दि.३०) तळेगाव रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळला. तपासात तो गणेश काळे असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस गणेशच्या राहत्या खोलीत गेले असता तेथे दिव्या मृतावस्थेत सापडली. तिच्या नाकावर मार लागल्याचे आढळून आले आहे. दरम्यान दिव्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दिव्याचा मृत्यू आणि गणेशची आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×