Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

मराठवाड्यातल्या अडीच हजार आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना शासनाने दिली मदत

मराठवाड्यातल्या अडीच हजार आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना शासनाने दिली मदत

पूर्नवसन मंत्र्यांनी विधीमंडळात दिली माहिती

marathinews24.com

बीड – राज्यात मराठवाडामध्ये शेतकरी आत्महत्या सर्वाधिक होत आहेत. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटूंबियास आर्थिक मदत दिली जाते. मदत दिली जात असतांना त्याला वेगवेगळे निकष लावले जात असतात. त्या निकषात बसल्यानंतरच मयत शेतकऱ्यांच्या कुटूंबियास शासन मदत देत असते. मराठवाड्यातील २ हजार ५७४ शेतकऱ्यांच्या वारसास आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती पूर्नवसन मंत्र्यांनी विधीमंडळात दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत – सविस्तर बातमी 

नापिकी, नैसर्गिक संकट, कर्जबाजारीपणा, शेतीमालाला नसणारा योग्य भाव यासह इतर कारणामुळे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटूंबियासा शासनाकडून आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र त्यालाही वेगवेगळे निकष लावले जात आहेत. सध्या राज्याचं अधिवेशन सुरूआहे. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मराठवाड्यामध्ये २ हजार ५९० शेतकरी आत्महत्याचे प्रकरणे झाले असून त्यामध्ये पात्र २ हजार ५७४ शेतकरी कुटूंबियास शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती पुर्नवसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. दरम्यान दरवर्षी मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी योग्य त्या उपाय योजना आखणे गरजेचे आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×