Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

‘गुरुवर्य आबासाहेब अत्रे’ पुरस्कार डॉ. अ. ल. देशमुख यांना; ‘इंदिरा अत्रे’ पुरस्कार भैलुमे व देसाई यांना जाहीर

२९ नोव्हेंबर रोजी रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीत पुरस्कार वितरण

marathinews24.com

पुणे – किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‌‘आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांना तर ‌‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ क्रीडा क्षेत्रातील निवृत्त शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते संजय भैलुमे तसेच कर्णबधिर मुलांच्या शिक्षिका, निवेदक, लेखिका विनया देसाई देण्यात येणार आहे.

मतांसाठी जनता विकली जात असेल तर संविधान जागर कशासाठी- डॉ. श्रीपाल सबनीस – सविस्तर बातमी

पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, ‌दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी‌, ३५२, सोमवार पेठ, पुणे ४११ ०११ येथे संस्थेच्या खुल्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे चौदावे वर्ष असून हे पुरस्कार ज्येष्ठ सर्जनशील शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन र. एकबोटे यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत, अशी माहिती पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे व दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

डॉ. अ. ल. देशमुख यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप पंधरा हजार रुपये व मानचिन्ह असे आहे. तर संजय भैलुमे व विनया देसाई यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दहा हजार रुपये व मानचिन्ह असे आहे.

पुणे शहराच्या पूर्व भागातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल वर्गाच्या उन्नती करता झटणारी ‌दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी‌ ही शिक्षण संस्था नावारूपाला आणण्यात गुरुवर्य आबासाहेब अत्रे व त्यांच्या पत्नी इंदिराबाई अत्रे यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आबासाहेब अत्रे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही मौलिक कार्य केले तर इंदिराबाई अत्रे यांनीही अध्यापनासोबतच आपल्या कलागुणांना जाणीवेने जोपासले आणि त्याचा इतरांना लाभ करून दिला. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या कन्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत हा पुरस्कार दरवर्षी शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तिमत्वांना देण्यात येतो, असे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. यांनी सांगितले.

राष्ट्रपती पदक विजेते डॉ. अ. ल. देशमुख हे लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील माजी शिक्षक असून नापासांची शाळा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शैक्षणिक धोरण ठरवणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत.

संजय भैलुमे यांनी लक्ष्मीनगर, पर्वती भागातील क. भा. हिरे हायस्कूल येथे क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत असताना कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्समध्ये अनेक खेळाडू घडविले. सामाजिक कार्यामुळे ‘वस्तीतील शिक्षक’ अशी त्यांची ओळख आहे.

विनया देसाई यांनी कर्णबधिर मुलांच्या शिक्षिका म्हणून तीन दशकांहून अधिक काळ कार्य केले आहे. त्या लेखिका व उत्कृष्ट निवेदिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×