Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात गुटख्याची वाहतूक करणारा अटकेत

पुण्यात गुटख्याची वाहतूक करणारा अटकेत

६ लाखांच्या गुटख्यासह १३ लाखांचा ऐवज जप्त

marathinews24.com

पुणे – टेम्पोतून विमल गुटख्यासह पान मसाला सुगंधी तंबाखूची वाहतूक करणार्‍या तस्कराला गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली आहे. त्याच्याकडून ६ लाख ३१ हजारांचा विमल गुटखा, ७ लाखांचा टेम्पो असा मिळून १३ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. नगाराम देवाराम जाट (वय ३१, रा. लोहगाव, मूळ- देसुरी, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूदृध लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अमली पदार्थ कोणाकडून घेतले होते, तो कोणाला विक्री करणार होता, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पादचारी जेष्ठेचे पावणेदोन लाखांचे गंठण हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनीट चार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण राजपूत आणि हवालदार सुभाष आव्हाड यांना लोहगावातील साठेवस्तीजवळ टेम्पोतून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने कृष्णा मार्टजवळ सापळा रचून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. आरोपीकडील टेम्पोतून ६ लाख ३१ हजारांचा गुटखा जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, एपीआय प्रवीण राजपूत, प्रवीण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, किशोर दुशिंग, शरद झांजरे, मयुरी नलावडे, रोहिणी पांढरकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×