Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी महराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी महराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

राज्यांच्या संसदीय परंपरा, विधीमंडळातील कामकाज यांसारख्या मुद्द्यांवर सुसंवाद

marathinews24.com

मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आज हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. या सौजन्य भेटीप्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे देखील उपस्थित होते. या भेटीत दोन्ही राज्यांच्या संसदीय परंपरा, विधीमंडळातील कामकाज यांसारख्या मुद्द्यांवर सुसंवाद झाला. संसदीय सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण ही लोकशाहीच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

नवकल्पनांचा शोध हेच डॉ. सुधीर हसमनीस यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य- वन्यजीव छायाचित्रकार राहुल सचदेव – सविस्तर बातमी 

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या कार्याची हरियाणाचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी प्रशंसा केली. ही भेट सौहार्द, सन्मान व सहकार्य यांचे प्रतीक ठरली असून, दोन्ही राज्यांतील विधिमंडळांमधील संबंध अधिक दृढ करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×