Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

तो हैदराबादहून सिंहगड बघायला आला अन बेपत्ता झाला

पोलिसांकडून तिसऱ्या दिवशीही तरुणाची शोधमोहीम

marathinews24.com

पुणे – मूळचा हैद्राबादमधील असलेला तरुण पुण्यातील सिंहगडावरून बुधवारी बेपत्ता झाला आहे. मागील तीन दिवसांपासून त्याचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी शुक्रवारी सिंहगड किल्ला परिसरात शाेधमोहीम राबविली. मात्र, बेपत्ता तरुणाचा ठावठिकाणा लागला नाही. गौतम गायकवाड (वय २४, रा. हैद्राबाद) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.

खुशखबर…गणेशोत्सवानमित्त गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी – सविस्तर बातमी

हैद्राबादमधील गौतम त्याची नियोजित पत्नी आणि तीन मित्रांसोबत सिंहगड किल्ला परिसरात बुधवारी (२० ऑगस्ट) पर्यटनासाठी आला होता. तरुण तेथून बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी हवेली पोलिसांना या घटनेची महिती दिली. बेपत्ता झालेल्या गौतमचा स्थानिकाच्या मदतीने शोध घेण्यात आला. गेले तीन दिवस तरुणाचा शाेध घेण्यात आला. शुक्रवारी सिंहगड किल्ला परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली, अशी माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.

सिंहगड किल्ला परिसरात वनविभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा किल्ल्याच्या परिसरात एक तरुण आढळून आला. पोलिसांनी हे चित्रीकरण तपासले. तरुणाच्या आई-वडिलांना चित्रीकरण दाखविले. बेपत्ता झालेल्या गौतमचे आई-वडील मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. ते कामानिमित्त काही वर्षांपूर्वी हैद्राबादमध्ये स्थायिक झाले. बेपत्ता झालेला गौतम हैद्राबादमध्ये कॅफे चालवितो. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. त्याच्या बेपत्ता होण्यामागचे कारण समजले नाही. सर्व शक्यता गृहित धरून पाेलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×