शालेय मुलीला धीरही दिला अन दाम्पत्याच्या संसारही वाचविला

शालेय मुलीला धीरही दिला अन दाम्पत्याच्या संसारही वाचविला

दामिनी मार्शलचे कौतुकास्पद कामगिरी

marathinews24.com

पुणे – आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या प्रक्रियामुळे सततच्या वादविवादाला कंटाळून घर सोडून जाण्याच्या तयारीतील एका दहावीच्या विद्यार्थिनीचे पुणे पोलिसांच्या दामिनीने मनपरिर्वतन करीत जीव वाचविला आहे. संवेदनशील प्रकरणात कौतुकास्पद कामगिरी बजाावून अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थिनीला घर सोडण्यापासून परावृत्त केले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दामिनी मार्शल सोनाली हिंगे (बॅज क्र. १०९२०) असे त्यांचे नाव आहे. वरिष्ठ पोली निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थिनीचे समुपदेशन करण्यात आले आहे.

पुण्यात उर्ग्येन संघरक्षित यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव – सविस्तर बातमी 

दामिनी मार्शल हिंगे यांच्या मोबाईलवर १८ ऑगस्टला सकाळच्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून विद्यार्थिनीचा फोन आला. ‘दिदी, मला मदतीची गरज आहे. मी घर सोडून चालले आहे, मला खूप टेन्शन आहे,’ असे तिने सांगितले. विद्यार्थिनी १० वीमध्ये शिकणारी अव्वल असून तिच्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याने ती मानसिक तणावात असल्याचेही दामिनीला समजले. याप्रकरणी तत्काळ प्रतिसाद देत दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांनी विद्यार्थिनीची भेट घेतली. तिला समजावून घेत तिचे मनपरिवर्तन केले. त्यानंतर शाळेत जाऊन प्राचार्य मॅडम यांच्यासोबत चर्चा केली. मुलीच्या आई-वडिलांना बोलावून समुपदेशन केले.

दाम्पत्यानेही घटस्फोटाची तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला

अभ्यासात हुशार असलेल्या मुलीने आपल्या भांडणामुळे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर दाम्पत्याने मुलीचे भवितव्य लक्षात घेऊन आपसातील वाद बाजूला ठेवत घटस्फोटाची केस मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक आनंदी कुटुंब म्हणून पुन्हा एकत्र राहण्याचे ठरवले आहे. आई-वडिलांच्या निर्णयामुळे विद्यार्थिनी खुश झाली असून तिने, तिच्या शाळेच्या प्राचार्यांसह दामिनी मार्शल हिंगे यांच्यासह पुणे शहर पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×