Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

स्वतः फसले अन साडू, मेव्हणीलाही अडकवले

शेअर ट्रेडींगमधील गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक

जादा परताव्याच्या आमिषापोटी गमावले सव्वा कोटी रूपये

marathinews24.com

पुणे – नागरिकांनो जादा परताव्याची हाव नेहमीच घातक ठरल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, तरीही अनेकांना हाव सुटत नसल्याचे फसवणूकीनंतर सिद्ध होत आहे. तोपर्यंत वेळ, पैसा निघून गेलेला असतो. सायबर पोलिसांसह वर्तमानपत्रे, प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनजागृती करूनही नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यासोबतच ते स्वतःसह नातेवाईकांनाही मोहात पाडत असल्याचे दिसून आले आहे.

मनी लॉड्रींग केसच्या बतावणीने जेष्ठाला १९ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

शेअर ट्रेडींगमध्ये जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुण्यातील हडपसर परिसरात राहणार्‍या ४८ वर्षीय नागरिकाला जाळ्यात अडकवले. त्यानंतर संबंधिताने आपल्या नातेवाईकांनाही गुंतवणूकीला भाग पाडले. स्वतःसह साडू, मेव्हणीकडील रक्कम घेउन शेअर मार्केटमध्ये गुंतवली. मात्र, सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा न देता तब्बल १ कोटी २० लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर कालावधीत हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार संबंधित फसवणूकीबाबत आता सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसर परिसरातील अ‍ॅमनोरा रोड परिसरात राहायला आहेत. ५ सप्टेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅप मेसेजद्वारे संपर्क केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. स्वतःसह मेव्हणी आणि साडूकडूनही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली. त्याबदल्यात रक्कम मिळवण्यासाठी आणखी १० टक्के गुंतवणूक करा, असे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधिताने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×