Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कुख्यात गुंड गजा मारणेला उच्च न्यायालयाचा दिलासा

कुख्यात गुंड गजा मारणेला उच्च न्यायालयाचा दिलासा

१५ ते १६ जानेवारीला पुण्यात येण्याची परवानगी

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ महाराज याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याला १५ व १६ जानेवारीला पुण्यात येण्याची परवानगी दिली असून, पोलिसांसह न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करावे लागणार आहे. मारणे टोळीने मागील वर्षी कोथरूड परिसरात उच्चशिक्षित तरूणाला बेदम मारहाण केली होती. त्यापार्श्वभूमीवर गुंड मारणेसह टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. दरम्यान, पुण्यात न राहण्याच्या अटींवर नुकताच त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अ‍ॅड. विजयिंसह ठोंबर यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली.

बजाज कंपनीकडून ‘डोमिनार ४००’ मोटार सायकलीचे पोलीस दलास हस्तांतरण – सविस्तर बातमी 

मारणे टोळीविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, मारहाण, ताबामारी अशास्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यासह विविध गुन्ह्यात कुख्यात गजा मारणे याच्याविरूद्ध पुणे पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीत मारणेची बायको जयश्री मारणे हिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मारणे कुटूंबियांनी प्रचाराला गती दिली होती. पोलिसांच्या तपासात गुंड गजा मारणे याने शहराबाहेर राहून फोनाफोनी करीत मतदारांना दबाव टाकल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याला काही दिवसांपुर्वी बोलावून घेत सज्जड दम दिला होता. मतदारांना प्रलोभन दाखवणे, मतदान करण्यासाठी दमबाजी करणे, पैसे वाटण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला होता.

मतदानासाठी मोक्का न्यायालयाने दिली परवानगी

मोक्का गुन्ह्यात आरोपी असल्यामुळे गजानन मारणे पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरात राहत आहे. मतदानासाठी शहरात येण्याची परवानगी मिळावी, यासाठी त्याने मोक्का न्यायालयात अर्ज केला होता. त्याच्या मागणीनुसार मोक्का न्यायालयाने त्याला १५ जानेवारीला मतदान करण्यासाठी कोथरूडमध्ये जाण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, मारणेचा वकील अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी काही दिवसांपुर्वी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार सोमवारी दि.१२ उच्च न्यायालयाने मारणेला १५ व १६ जानेवारीला पुण्यात वावरण्याची परवानगी दिली असल्याचे अ‍ॅड. ठोंबरे पाटील यांनी सांगितले आहे.

मारणेवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष

पत्नी जयश्रीच्या प्रचारासाठी १५ जानेवारीला सकाळपासूनच गुंड गजा मारणे सक्रिय होउ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याच्याकडून मतदारांवर दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी कोथरूड पोलीस आणि गुन्हे शाखा दोन दिवस अलर्ट राहणार आहे. जर मारणेने काही अनुचित प्रकार केल्यास त्याच्याविरूद्ध ठोस कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×