Breking News
Robotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेत

बाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेश

बाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेश

संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश

marathinews24.com

पुणे – बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळ भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक सोयी-सुविधा यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महापालिका, वाहतूक पोलिस, पोलिस आयुक्त कार्यालय, एनएचएआय, पीएमआरडीए आदी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! – सविस्तर बातमी 

या बैठकीत कोथरूड मतदारसंघाचे आमदार तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील प्रमुख उपस्थित होते. त्यांनी नागरिकांकडून आलेल्या समस्यांची गांभीर्याने नोंद घेतली आणि संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सण-उत्सवाचा काळ सुरू होण्याआधी सर्व प्रमुख प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मा. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत नागरिकांनी ज्या मुद्द्यांवर भर दिला त्यात जुपिटर चौक, गणपती मंदिर चौक, दसरा चौक, ममता चौक, सीएम इंटरनॅशनल, साई चौक, राधा चौक येथील वाहतूक नियोजन, सिग्नल, वॉर्डन्सची संख्या वाढवणे, अतिक्रमण हटवणे, अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी ड्रेनेज दुरुस्ती, सबस्टेशनची उभारणी आणि दारू दुकानदारामुळे होणारा त्रास हे विषय होते.

नागरिकांनी विशेषतः नानावरे ब्रिजजवळील साचलेले पाणी, पदपथ अतिक्रमण, बसस्टॉपची आवश्यकता, रस्ते व फूटपाथ दुरुस्ती, झाडांची छाटणी, मेट्रो पुलाखालच्या ठिकाणी साचलेले पाणी, आणि रस्ते अधिग्रहणाच्या समस्यांबाबत सविस्तर मांडणी केली. यावर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला सदानंद रेसिडेन्सी हॉटेलजवळील सर्व्हिस रोड अंडरपास संदर्भातील मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावर त्वरित उपयोजना करून काम सुरू करण्याच्या सूचना NHAI अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, हे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

या बैठकीत बालेवाडीतील सर्व फेडरेशनचे प्रतिनिधी, तसेच पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस, महाळुंगे येथील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी, प्रकाश तात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, ज्योतीताई कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, शिवम सुतार, शिवम बालवडकर, अस्मिता करंदीकर तसेच कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×