Breking News
Sinhagad Road Crime News : पुण्यात वर्षभरापासून फरार असलेला आरोपी जेरबंदSunetra Pawar Diwali Celebration : दुष्काळीदौऱ्यात भाऊबीजेचा स्नेहबंध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोनकरवस्तीवर शेतकरी कुटुंबासोबत केला फराळPune Murder Case News : दुचाकी अपघातात जावयाचा मृत्यू झाल्याचा बनावPune Diwali Theft News : पुण्यात लक्ष्मीपूजनानिमित्त चोरट्यांचा उच्छादSinhagad Fort Development Plan : हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध – सभापती युवराज काकडेBaramati Wrestling Gold Medal 2026 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरीIndapur Farmer Diwali News : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा घोरपडवाडी येथे शेतकऱ्याच्या घरी दिवाळी फराळBirsa Munda Jayanti 2026 : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजनDiwali With A Purpose Pune : कर्करोगग्रस्त रुग्णांना भावनिक आधार; दिवाळी विथ अ पर्पज’ उपक्रमPune Guruwar Peth Fire News : पुण्यात गुरुवार पेठेत फटाक्यामुळे वाड्याला आग

‘न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही- डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. गौरी पालवे–गर्जे आत्महत्या प्रकरण

marathinews24.com

बीड – बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे गुरुवारी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्व. डॉ. गौरी पालवे–गर्जे यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील प्रश्न, वेदना आणि न्यायाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. “गौरी पालवे–गर्जे यांचा मुंबईतील मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. तिच्या कुटुंबाने काही महत्त्वाची अतिरिक्त माहिती पोलिसांना द्यायची इच्छा व्यक्त केली; परंतु त्यांची नोंद झाली नव्हती. या तक्रारीची मी तत्काळ दखल घेऊन मुंबई पोलिसांशी तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले असून, पुढील दोन-तीन दिवसांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्व पुरवणी जबाबांची नोंद केली जाणार आहे.

संविधान दिनानिमित  रंगला ‘संविधान लोककला शाहिरी जलसा’ – सविस्तर बातमी

कुटुंबीयांनी आरोपीचे भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे यांनाही अटक करावी, अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गौरीवर पूर्वी अनेकदा मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितल्याने या प्रकरणाचे मूळ कारण नीट समजून घेणे अत्यावश्यक असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. उपसभापती म्हणून जबाबदारी आहेच, पण आई म्हणूनही हे प्रकरण मन हेलावून टाकणारं आहे. कुटुंबीयांना सक्षम सरकारी वकील मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे.

तपासात कुठलाही दबाव सहन केला जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले. न्याय प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई पोलिसांना दोन महत्त्वाचे निर्देश दिले. तपासाच्या प्रगतीबाबत अधिकृत बुलेटीन दर दोन दिवसांनी पत्रकारांना देण्यात यावे, जेणेकरून अफवा आणि अप्रमाणित माहितीला आळा बसेल. अशा संवेदनशील खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडितेवरच आरोप केले जातात; म्हणून संपूर्ण सुनावणीचे इन कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी न्यायालयात विनंती करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. जवळील गावातील पॉक्सो प्रकरणातील तक्रार नोंदवण्यात उशीर झाल्याबाबतही त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. “महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारींची त्वरित आणि गांभीर्याने नोंद होणे आवश्यक आहे. गावांमध्ये पॉक्सो कायद्याबाबत जागृती वाढवण्यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. पॉक्सो प्रकरणातील पीडित मुली आणि पालकांना तपासाच्या प्रगतीची नियमित माहिती देण्याबाबत भारतीय न्यायसंहितेतील नव्या तरतुदींची माहितीही त्यांनी दिली.

न्यायप्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी आर्थिक मदत

गौरी पालवे–गर्जे यांचे आई-वडील न्यायासाठी लढत असताना त्यांच्यावर आर्थिक ताण येऊ नये, यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक ती आर्थिक मदत वैयक्तिक पातळीवरून कुटुंबीयांना दिली आहे. “न्याय मिळविण्यासाठी कोणतीही कमतरता राहू देणार नाही. कुटुंबाच्या पाठीशी मी वैयक्तिकरीत्या उभी आहे,” असे त्या म्हणाल्या.

“गौरीच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. न्याय मिळण्यासाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा तितक्याच कटाक्षाने काम करतील,” असा निर्धार डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. भेटीत शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी राज्य महिला आयोग सदस्य व बीड जिल्हा संपर्क प्रमुख ऍड संगीता चव्हाण उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×