Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ

पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ

‌‘स्वरमाऊली जयमाला‌’ ध्वनीचित्रफीत प्रदर्शित

marathinews24.com

पुणे – मराठी रंगभूमि, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज (दि. 21 ऑगस्ट) शुभारंभ झाला. या निमित्ताने जयमालाबाई शिलेदार यांची सांगीतिक कारकीर्द उलगडणारी ‌‘स्वरमाऊली जयमाला‌’ ही ध्वनीचित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रम ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. किरण ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. दीप्ती शिलेदार-भोगले मंचावर होत्या. ध्वनीचित्रफीतीचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखिका ज्ञानदा नाईक यांच्या हस्ते झाले.

जीआय नामांकन प्राप्त पिकांच्या पॅकेजींग व ब्रँडींगसाठी मदत करण्यास शासन सकारात्मक – सविस्तर बातमी 

याप्रसंगी जयमालाबाई शिलेदार यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीपासून तानपुरा बनविणारे सांगलीच्या मिरजकर कुटुंबातील आजच्या पिढीतील कलाकार मजिदभाई मिरजकर यांचा तसेच संगीत नाट्यप्रयोगाआधी रंगमंच पूजनावेळी संपूर्ण आसमंत सुगंधाने दरवळून टाकणाऱ्या दामोदरदास भगवानदास सुगंधीचे संचालक देवेंद्र सुगंधीवाले यांचा विशेष गौरव डॉ. किरण ठाकूर, उल्हास पवार यांच्या उपस्थितीत केला. पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना सहकार्य करणाऱ्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या संचालिका शुभांगी दामले यांना जयमालाबाई शिलेदार यांचे छायाचित्र दीप्ती शिलेदार-भोगले यांच्या हस्ते भेट देण्यात आले.

डॉ. किरण ठाकूर म्हणाले, शिलेदार कुटुंबियांनी संगीत नाटकाची परंपरा आजवर सुरू ठेवली आहे. बेळगावात शिलेदार कुटुंबियांची अनेक संगीत नाटके पाहण्याचा योग मला आला. मी वयाच्या सहाव्या वर्षी पाहिलेली नाटकातील राजकन्या म्हणजे कीर्ती शिलेदार होत. बेळगाव येथे साकारत असलेल्या नाट्यगृहाचा भूमिपूजन समारंभ जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दीवर्षात होणार असून नाट्यगृहाला जयमाला जयराम शिलेदार नाट्यगृह असे नाव देण्याचे निश्चित केले आहे.

महाराष्ट्र, गोवा आणि बेळगावमधील रसिक संगीत नाटकवेडे आहेत. संगीत नाटकात अभिनय करणाऱ्या व्यक्तीने गायक असणे आवश्यक आहे. असे गायक कलाकार आजच्या पिढीतही निर्माण व्हावेत तसेच संगीत नाटकांचा सुवर्णकाळ गाजविणाऱ्या कलाकारांची ओळख चित्रपटाच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर होणाऱ्या उपक्रमांसाठी पाच लाख रुपयांची देणगीही त्यांनी जाहीर केली.

दीप्ती शिलेदार-भोगले म्हणाल्या, माझी आई जयमाला शिलेदार यांच्यावर ध्वनिचित्रफित निर्माण करत असताना तिचे अनेक पैलू पहिल्यांदाच जाणवले. आई एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून किती महान होती हे मी आजही समजून घेत आहे. रंगमंचावर साभिनय गाणे कसे सादर करावे, पात्राशेजारी उभे राहताना हावभाव कसे ठेवावेत, शब्दांची फेक कशी असावी, गायनाबरोबरच संवाद कसे सादर करावेत असे अनेक बारकावे ध्वनी चित्रफीतीच्या माध्यमातून आजच्या पिढीला शिकायला मिळतील, असा विश्वास वाटतो.

जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येत्या वर्षात विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर यांनी प्रास्ताविकात दिली. मान्यवरांचे स्वागत ट्रस्टचे विश्वस्त मारुतराव जाधव यांनी केले. सत्कारार्थींचा परिचय अतुल खांडेकर यांनी करून दिला तर आभार निनाद जाधव यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×