पिस्तूलासह काडतुसे बाळगणारा सराईत अटकेत

पर्वती पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन जिवंत काडतुस बाळगणार्‍या सराईताला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३७ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. भिमराव नरसप्पा मानपाडे ( वय २४ रा. साईनगर २ रा मजला, साई जीम जवळ, गुलाबनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पर्वती पोलीस १३ डिसेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख, स्वप्निल घुगे यांना सराईताची माहिती मिळाली.

एमबीबीएस प्रवेशाच्या बहाण्याने सव्वा कोटींचा गंडा – सविस्तर बातमी 

पथकाने सापळा रचून भीमराव मानपाडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्टलासह जिवंत काडतुस जप्त केले आहे. आरोपीविरुध्द यापुर्वी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी उपायुक्त संभाजी कदम, एसीपी सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार प्रकाश मरगजे, सुर्या जाधव, अमोल दबडे, किर्ती भोसले, राकेश सुर्वे, नानासाहेब खाडे, अमित चिव्हे समिर जोशी यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×