Breking News
पुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजन

पिस्तूल बाळगणारे सराइत अटकेत

खंडणी विरोधी पथकाची शनिवार पेठेत कारवाई

marathinews24.com

पुणे – पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळ ही कारवाई करण्यात आली. सराइतांकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले. रवींद्र लक्ष्मण रसाळ (वय २१, रा. चिरमोडी, गुंजवणी, ता. वेल्हा, जि. पुणे) , अथर्व अभिमन्यू शेजवळ (वय २०, रा. शिवांश अपार्टमेंट, आंबेगाव पठार, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात घरफोडी करणाऱ्या सराईताला अटक – सविस्तर बातमी

रसाळ हा सराइत असून, तो साथीदारासह नदीपात्रातील वर्तक बागेजवळ थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे, मंगेश गुंड यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले.

सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, अमोल आवाड, मयूर भोकरे, मंगेश गुंड, दुर्योधन गुरव, बालारफी शेख, रहीम शेख यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×