Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात घरफोडी करणाऱ्या सराईताला अटक; पिस्तुलासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेची हडपसर परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – घरफोडी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या पथकाने हडपसर भागातून अटक केली. त्याच्याकडून पिस्तुलासह सोन्याचे दागिने असा १८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात चोरट्याने घरफोडीचे तीन गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. हंसराज सिंग उर्फ हँसू रणजितसिंग टाक (वय १९, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलेला मदत केली नाही – सविस्तर बातमी

टाक हा सराइत चोरटा आहे. त्याने घरफोडीचे गुन्हे केले असून, तो तुळजाभवानी वसाहतीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी कानिफनाथ कारखेले आणि नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून टाकला पकडले. त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्या घरातून पिस्तूल, काडतुसांचे मोकळे मॅगझीन, काडतूस, १७ लाख ८१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा १८ लाख २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टाकने सहकारनगर, पिंपरी-चिंचवडमधील चिखली, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळसाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, नीलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×