Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला बेड्या

१ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील वारजे माळवाडी पोलिस ठाण्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने जेरबंद केले. त्याच्याकडून पिस्तूल व ४ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. सागर गणेश सुतार (वय २५, रा. सर्वे नं ४४, दुर्गादेवी मंदिराशेजारी, गणपती माथा, वारजे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात आर्म ऍक्ट क. ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मनी लॉड्रींगच्या धमकीने महिलेला गंडा – सविस्तर बातमी

आरोपी सागर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापुर्वीचे वारजे माळवाडी, उत्तमनगर व सिंहगड रोड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, चोरी व आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, खंडणी विरोधी पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पोलिस अंमलदार अमोल आवाड व मयुर भोकरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी सागर गणेश सुतार याच्याकडे पिस्टल असून तो देशमुखनगर शिवणे येथे मोकळया जागेत बसलेला आहे. त्यानूसार, पथकाने या ठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एकूण ४० हजार ८०० रुपये किंमतीचे १ सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्टल व त्याचे मॅग्जिनमध्ये ४ जिवंत काडतुसे असे मिळून आले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळेगाव, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व पोलिस अंमलदार बालारफी शेख, अमोल आवाड, मयुर भोकरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×