Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

प्रेरणादायी प्रवास ; प्रा. माने यांना पीएच.डी. पदवी प्रदान

प्रेरणादायी प्रवास ; प्रा. माने यांना पीएच.डी. पदवी प्रदान

मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात प्रा. माने यांचा गौरव

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील प्राध्यापक बाबासाहेब माने यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. हा दीक्षांत समारंभ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (कबरएफ) येथील प्राध्यापक डॉ. सुनील भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला..कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव प्रा. प्रशांत अमृतकर यांच्यासह प्रा. बाबासाहेब डोळे उपस्थित होते.

पुणे महापालिका मतदानासाठी १२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा – सविस्तर बातमी 

प्रा. बाबासाहेब माने यांनी नव्वदोत्तर काळातील बदलत्या राजकारणाच्या संदर्भात विजय जावळे यांच्या कथात्मक साहित्याचा अभ्यास या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. हा प्रबंध यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्राचार्य डॉ. शिवदास झेड. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. प्रा. माने यांनी एम.ए. बी. एड. एम. फिल. अशा पदव्या
यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत, त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विभागप्रमुख तथा प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, उपप्राचार्य प्रा. शिंदे सर, प्रा. दिलीप भिसे, प्रा. राजपंखे, प्रा. घोडके, प्रा. भारती, प्रा. लोखंडे, प्रा. सुरेवाड, प्रा. हंडीबाग यांच्यासह यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत जिल्हाभरातून त्याचे कौतुक होत आहे.

प्रेरणादायी वाटचाल

सर्वसामान्य कुटुंबातून आलेले प्राध्यापक बाबासाहेब माने यांचा शैक्षणिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना आलेल्या अडचणी, मर्यादित साधनसंपत्ती असूनही त्यांनी अभ्यासाची कास सोडली नाही, शिक्षक म्हणून कार्य करत असतानाच उच्च शिक्षण आणि संशोधनाची जिद्द त्यांनी कायम जपली. विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागणारे, अभ्यासाबरोबरच सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रा. माने ओळखले जातात. कष्टाला पर्याय नाही हा मंत्र त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे. पीएच. डी. पदवी मिळवणे हे केवळ वैयक्तिक यश नसून ग्रामीण भागातील तरुणांसाठी हे प्रेरणा देणारे यश आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×