Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुणे महापालिका मतदानासाठी १२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा

पुणे महापालिका मतदानासाठी १२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपुर्ण तयारी-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणूक मतदानाच्या रणसंग्रामासाठी पुणे पोलीस दल सज्ज झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी ते पोलीस अमलदार असा तब्बल १२ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही संपुर्ण तयारी केली आहे. संवेदनशील मतदार केंद्रासह महत्वाच्या केंद्रावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

‘पुणे ग्रँड टूर’ यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मार्गावर अचूक तयारी करावी- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – सविस्तर बातमी 

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, पोलीस अमलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एसीपी आणि उपायुक्त अशापद्धतीने बुथ केंद्रावरील चारस्तरीय सुरक्षितता तैनात केली जाणार आहे. वादविवादासह अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी पथक दक्ष आहेत. पुण्यात तब्बल ३ हजार ९८३ बुथ केंद्र असून, प्रत्येक केंद्रावर एक कर्मचारी तैनात केला जाणार आहे. ९१३ इमारतीत संपुर्ण मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याठिकाणी दोन अमलदार नियुक्त केले जाणार आहे. प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांकडून पेट्रोलिंग केले जाणार आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

पुणे गुन्हे शाखेचा तगडा बंदोबस्त

मतदान प्रकियावेळी कायदा सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेवरही आहे. त्याअनुषंगाने जबाबदारी वाटून घेण्यासाठी ४५४ झोन केले आहेत. त्याठिकाणी हद्दीतील ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शानाखाली पेट्रोलिंग केले जाणार आहे. त्याचा आढावा वरिष्ठ अधिकार्‍यांना दिला जाणार आहे. दरम्यान, शहरात ९० संवेदनशील मतदान ठिकाणे असून, त्यादृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. त्याठिकाणी १ अधिकारी आणि ५ कर्मचारी नियुक्त केले जाणा आहेत. तर ८ क्यूआरटी टीम दक्ष ठेवण्यात आल्या आहेत. तसेच ६ अतिवरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत प्रत्येकी ५० पोलीस अमलदारांचे स्ट्रायकिंग असणार आहे.

पुणे पोलिसांचा बंदोबस्त

पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त-४, पोलीस उपायुक्त-१४, पोलीस अमलदार व अधिकारी- ७ हजार, होमगार्ड- ३ हजार, एसआरपीफफ-४ कंपन्या, बाहेरून मागवलेले अधिकारी कर्मचारी-१ हजार ५००, दुचाकीद्वारे पेट्रोलिंग- ५०० कर्मचारी, क्यूआरटी-८ टीम तैनात आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, अपर आयुक्त संजय पाटील, अपर आयुक्तम मनोज पाटील, अपर आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक झोनचे पोलीस उपायुक्तांच्या देखरेखीतून मतदान शांततेत पार पाडले जाणार आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडणसाठी आम्ही दक्ष असून, त्यादृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. संवेदशनील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तर कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही.

अमितेश कुमार पोलीस आयुक्त , पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×