Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

बीएस एज्युकेशन संस्थेच्या तक्रारींची चौकशी करुन अहवाल सादर करा -उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

बीएस एज्युकेशन संस्थेच्या तक्रारींची चौकशी करुन अहवाल सादर करा -उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

 पुण्यात जनसुनावणी संपन्न

marathinews24.com

पुणे – नागपूरमधील बीएस एज्युकेशन संस्थेबाबत प्राप्त तक्रारींची महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे १५ दिवसात सादर करावा, असे निर्देश महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे ॲड. धर्मपाल मेश्राम दिले आहेत.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा रॅली संपन्न – सविस्तर बातमी 

व्हीव्हीआयपी विभाश्रगृह येथील सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्याकडे बीएस एज्युकेशन संस्थेबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित जनसुनावणीत त्यांनी हे निर्देश दिलेत. यावेळी महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे विधी अधिकारी ॲड. राहूल झांबरे, बार्टीच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी स्नेहल भोसले, निबंधक इंदिरा अस्वार, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील, सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या वतीने कौशल्य विभागाचे वरिष्ठ प्रकल्प संचालक सतीश पाटील उपस्थित होते.

ॲड मेश्राम म्हणाले, नागपूर येथील बीएस एज्युकेशन या बँकिग विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेविषयी विविध माध्यमातून तक्रारी प्राप्त झाल्याची आयोगाने गांर्भीर्याने दखल घेतली आहे. यासंबधी तक्रारदार संस्थांनी केलेल्या तक्रारीची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मुद्येनिहाय चौकशी करावी. तक्रारदार किंवा तक्रारदार संस्थांनी बीएस एज्युकेशन संस्थेविरुद्ध नमूद केलेले मुद्दे, विविध माध्यमातील वृत्त, संस्थेविरुद्ध मनपा, अग्निशमन विभाग व सहायक संचालक नगररचना अशा विविध विभागाने केलेल्या कारवाया, अटी व शर्तींचा भंग, विद्यार्थ्यांचे शपथपत्र बाबींची सर्वंकष चौकशी करावी. याकरिता आवश्यकतेनुसार मुनष्यबळ उपलब्ध करुन घ्यावेत.

बार्टी संस्थेने तक्रारदार किंवा तक्रारदार संस्थांनी बीएस एज्युकेशन संस्थेबाबत मागितलेली माहिती तात्काळ प्रभावासह उपलब्ध करुन त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करावा. सारथी संस्थेकडे प्राप्त तक्रारीची मुद्देनिहाय चौकशी करुन सारथी संस्थेच्या प्रमुखाच्या अभिप्रायसह वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल सादर करावा. चौकशी करतांना संस्थेबाबत करण्यात आलेला सामंजस्य करार, संस्था निवडीकरिता राबविण्यात आलेली निवडप्रक्रिया आदी माहिती विचारात घेण्याचे निर्देश ॲड मेश्राम यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यासंस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नागरी सेवा, राज्य सेवा, अभियांत्रिकी सेवा, बँकींग, मिलीटरी भरती, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे, याकरिता शासनाच्यावतीने करोडो रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो. या प्रक्षिणाचा उपयोग त्यांचे स्पर्धा परीक्षांमधील यश व सामाजिक आर्थिक जीवनमान उंचविण्याकरिता झाला पाहिजे, या कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश ॲड मेश्राम यांनी दिले. यावेळी बैठकीत तक्रारदार व तक्रारदार संस्था यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विभागाने करण्यात आलेली कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×