Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

पुण्यात आयपीएल विजयाचे सेलिब्रेशन भोवले

पुण्यात आयपीएल विजयाचे सेलिब्रेशन भोवले

गुडलक चौकात धांगडधिंगा घालणाऱ्या ४० जणांवर गुन्हा दाखल, डेक्कन पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – जगभरात गाजलेल्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल्स चॅलेंज बंगळुरूने विजेतेपद पटकावले. त्यामुळे तब्बल १८ वर्षापासून विजयासाठी आसुसलेल्या क्रिकेटवेड्या समर्थकांनी आनंदाने बेफाम होऊन धांगडधिंगा घातला. मात्र, त्यांनी बेशिस्तपणे वर्तणूक केल्यामुळे ३० ते ४० जणांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयाचे सेलिब्रेशन साजरा करताना हुल्लडबाज क्रिकेट रसिकांनी डेक्कनच्या मध्यवर्ती गुडलक चौकात वाहतूक कोंडीला अडथळा निर्माण केला. फटाक्यांचा आवाज, रस्त्यावरचा गोंधळ आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे धिंगाणा घालणाऱ्या ३० ते ४० अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीएमआरडीएकडून अनधिकृत सहा मजली इमारत जमीनदोस्त – सविस्तर बातमी 

विजयाचे सेलिब्रेशन करताना बेधुंद क्रिकेटवेड्या रसिकांनी फटाक्यांचा आवाज करीत रस्त्यावर गोंधळ घातला. सार्वजनिक शांततेचा भंगमुळे डेक्कन परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. ३ जूनला रात्री साडे अकरा वाजता सुरु झालेले सेलिब्रेशन रात्री उशिरापर्यंत सुरु होते. त्याकाळात संबंधितानी ना कोणतीही पूर्वसूचना दिली, ना परवानगी घेतली.थेट रस्त्यावर उतरून फटाके फोडले, रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असभ्य वर्तन केले. हुल्लडबाजी करत वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. त्यानुसार, पोलीसांनी आयपीसी कलम 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सध्या धांगडधिंगा घालणाऱ्या आरोपींची सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ओळख पटवण्याचे काम सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला गती देण्यात आली आहे, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली आहे. यापक्ररणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत यांनी फिर्याद दाखल केली असून, हेड कॉन्स्टेबल गायकवाड घटनेचा तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×