Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पीएमआरडीएकडून अनधिकृत सहा मजली इमारत जमीनदोस्त

पीएमआरडीएकडून अनधिकृत सहा मजली इमारत जमीनदोस्त

अनाधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या इमारतीवर कारवाई

marathinews24.com

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत होर्डिंग आणि बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी मारुंजी भागातील सर्वे नंबर ४५/१/२ मधील मोठ्या अनाधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली.

महापालिकेच्या मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया कक्षाची उभारणी – सविस्तर बातमी 

पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याची दखल घेत अशा बांधकामावर थेट कारवाई सुरू आहे. त्यानुसार गुरुवारी मारुंजी परिसरातील अनधिकृत असलेल्या सर्वे नंबर ४५/१/२ या भागातील ६ मजली इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली.

पीएमआयडीएने केलेला सर्वेक्षणात ९६७ अनाधिकृत होर्डिंग आढळून आल्या आहेत. गत काही दिवसात १२२ होर्डिंग अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या पथकामार्फत काढण्यात आल्या आहे. रहदारीस अडथळ तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा हवेली, भोर, मुळशी, पुरंदर, दौंड आदी भागातील अनाधिकृत होर्डिंगवर धडक कारवाई करण्यात येत आहे.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई प्रभारी महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील, प्रमोद कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी प्राधिकरणाचे तहसीलदार रविंद्र रांजणे, सचिन म्हस्के, पोलीस निरिक्षक महेशकुमार सरतापे यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×