Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

मराठ्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे कर्तव्य– पांडुरंग बलकवडे

मराठ्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे कर्तव्य– पांडुरंग बलकवडे

पुण्यात २६६ वा ‘पानिपत शौर्यदिन’ भव्यदिव्य साजरा

marathinews24.com

पुणे – श्रीमंत महाराज महादजी शिंदे हे मराठा सेनेतील अत्यंत महान, पराक्रमी योद्धे असण्यासोबतच दूरदृष्टी असलेले कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी होते. अत्यंत कठीण काळात त्यांनी मराठा साम्राज्याची सूत्रे हाती घेतली आणि आपल्या अद्वितीय युद्धनीती व कूटनीतीच्या जोरावर मराठा सत्ता पुन्हा सशक्त केली. पानिपतच्या युद्धात त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते. राजकारण, प्रशासन आणि मुत्सद्देगिरीत त्यांनी असाधारण क्षमता दाखवली. त्यांचे जीवन धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणादायी गाथा आहे. मराठ्यांचा इतिहास गौरवशाली असून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता १६ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात- वैभव नावडकर – सविस्तर बातमी 

मराठा साम्राज्याचे महान सेनानी श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या अदम्य शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेला अभिवादन करण्यासाठी २६६ वा पानिपत शौर्यदिन सोहळा पुण्यातील वानवडी परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन उत्तमराव मांडवे यांनी केले होते. या प्रसंगी आर. डी. पाटील, यशवंत भोसले, कुमार देशमुख, उमेश शिंदे, विलास शिंदे, शेखर ह्युलाकार, उत्तमराव मांडवे, निलेश शहाणे, ज्ञानेश्वर सपकाळ, रंजनाताई भोकरे, संजय मोहिते, विकास शिंदे, नितीन गुंजाळ, हिरामण सपकाळ, संजय देवकुळे, बाळासाहेब पाटील, विजय वंजारी, शशिकांत शिंदे, अजित गायकवाड, प्रदीप देशमुख, अभयसिंह दांडेपाटील, प्रवीण दाभाडे, दिलीप सावंत, शरद मडके, कृष्णन गणेश आदींसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, इतिहासप्रेमी नागरिक, माजी सैनिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वानवडी येथील ऐतिहासिक शिंदे छत्री येथे मराठा वीरांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पानिपतच्या पवित्र भूमीतून आणलेल्या मातीच्या मंगल कलशाचे पूजन करण्यात आले. पानिपतच्या युद्धात बलिदान दिलेल्या शूर मराठा योद्ध्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना पानिपतच्या युद्धातील मराठा वीरांच्या पराक्रमाचा गौरव केला व श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला.

उत्तमराव पांडुरंगराव शिंदे सरकार म्हणाले, मराठा साम्राज्याचा गौरव वाढवणारे महान योद्धे श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी१४ जानेवारीला पानिपत शौर्यदिन साजरा केला जातो. हा उपक्रम सलग आठव्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे. मराठ्यांचा इतिहास सर्वांपर्यंत, तसेच पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, हा या शौर्यदिनाचा मुख्य उद्देश आहे. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, इतिहासाची जाणीव आणि मराठा वीरतेची गौरवशाली परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×