Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता १६ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता १६ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती

marathinews24.com

बारामती – राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे बारामती तालुक्याकरिता जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ कार्यक्रम जाहीर झाला असून मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या १६ जानेवारी २०२६ पासून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे, नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी तहसील कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त – सविस्तर बातमी 

नावडकर म्हणाले, बारामती तालुक्यात जिल्हा परिषदेचे सुपा, गुनवडी, पणदरे, वडगाव निंबाळकर, निंबुत आणि निरावागज असे एकूण६ गट तर पंचायत समितीचे सुपा, काऱ्हाटी, शिर्सुफळ, गुणवडी, पणदरे, मुढाळे, मोरगाव, वडगाव निबांळकर, निंबुत, कांबळेश्वर, निरावागज, डोर्लेवाडी असे एकूण १२ गण आहेत. पुरुष मतदार १ लाख ३५ हजार ७३, महिला मतदार १ लाख २९ हजार ५६० आणि इतर ९ असे मिळून २ लाख ६४ हजार ६४२ इतकी आहे. मतदान केंद्र २९९ आहेत. उमेदवाकरिता खर्चाची मर्यादा जिल्हा परिषदेसाठी ९ लाख रुपये तर पंचायत समितीकरिता ६ लाख रुपये आहे. परवानग्याबाबत तहसील कार्यालय आदर्श आचारसंहिता कक्षामध्ये एक खिडकी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. एका उमेदवाराला ४ अर्ज दाखल करता येईल. निवडणुकीची मतमोजणी जिल्हा क्रीडा संकुलामधील बॅडमिटंन हॉलमध्ये होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे उमेदवारांना नामनिर्देश पत्रे दाखल प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, जाहीर सभा, प्रचार कालावधी, विविध परवानग्या, प्रतिनिधी नेमणूक तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्यादृष्टीने प्रशासन आणि राजकीय पक्षासोबत प्रतिनिधीची बैठक घेवून सूचना देण्यात आल्या आहे.

*जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक-२०२६ कार्यक्रम:* नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी : १६ ते २१ जानेवारी २०२६, नामनिर्देशनाची छाननी २२ जानेवारी २०२६, उमेदवारी माघाराची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६, निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी २०२६, अंतिम उमेदवारांची यादी २७ जानेवारी २०२६, मतदानाचा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ आणि मतमोजणीचा दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ असा आहे, अशी माहिती श्री. नावडकर यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×