Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

विवाह समारंभात वधू पक्षाकडील ६ लाखांचे दागिने लंपास

टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाह समारंभातून चोरट्यांनी रोकड, तसेच दागिने असा सहा लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना बाणेर भागातील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात सराईताकडून पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलीचा विवाह समारंभ २५ नोव्हेंबर राेजी बाणेर परिसरातील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यांनी एका टेबलवर गडबडीत पिशवी ठेवली. पिशवीत सोन्याचे दागिने, एक लाख ३० हजारांची रोकड, मोबाइल संच असा ऐवज होता. चोरट्यांनी त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवी चोरली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांनी मंगल कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करत आहेत.

विवाह समारंभातून दागिने चोरीला जाण्याची ही तिसरी घटना आहे. पंधरा दिवसांपूर्वी लोणी काळभोर परिसरातील एका मंगल कार्यालयातून चोरट्यांनी दागिने, रोकड असलेली पिशवी लांबविली होती.

पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६० हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला विश्रंतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. त्या विश्रांतवाडी भागातून धानोरीकडे निघाल्या होत्या. विश्रांतवाडीत बसमध्ये प्रवेश करतना चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कटरचा वापर करुन लांबविली.

डेअरीतून रोकड लांबविली

डेअरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ९२ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना धायरी भागात घडली. याबाबत एका तरुणाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात डेअरी आहे. चोरट्यांनी २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री डेअरीचे कुलूप तोडले. गल्ल्यातील ठेवलेली रोकड लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस कर्मचारी मोरे तपास करत आहेत.

पादचारी तरुणाला धमकावून मोबाइल हिसकावला

पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना स्वारगेट भागात घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शुक्रवारी (२८ सप्टेंबर) सकाळी सहाच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावरुन निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाला धमकावले. त्याच्या खिशातील ५० हजार रुपयांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×