Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पीएमपी प्रवासी महिलेच्या तत्परतेमुळे दागिने चोरणारी अटकेत

जागरूक प्रवाशांच्या मदतीने चोरी करणारी महिला रंगेहात पकडली

marathinews24.com

पुणे – पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने कापून नेण्याचा प्रयत्न करणारी महिला पकडली गेली. झटापटीत चोरट्याने महिलेने कटरने प्रवासी महिलेच्या हातावर वार करुन पसार होण्याचा प्रयत्न केला.

रोगनिदान केंद्रात महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

प्रवासी महिलेच्या तत्परतेमुळे दागिने चोरणारी महिला पकडली गेली. याप्रकरणी अश्विनी अविनाश भोसले (वय २९, रा. गंगेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हिला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५३ वर्षीय महिला पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात राहायला आहेत. त्या रविवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास महापालिका ते वसंत चित्रपटगृह दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. गर्दीत आरोपी भोसले हिने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरचा वापर करुन तोडण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. तिने आरडाओरडा केला. भोसलेने धावत्या बसमधून उडी मारुन पसार होण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी झटापटीत तिने तक्रारदार महिलेच्या हातावर कटरने वार केला. महिलेच्या हाताला दुखापत झाली. अशा परिस्थितीत तक्ररदार महिलेसह अन्य प्रवाशांनी भाेसलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी भोसलेला अटक करण्यात आली आहे. तिने पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×