घोरपडीत सहा लाखांचे दागिने चोरीला

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरातील कपाटातून चोरट्यांनी ५ लाख ८७ हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना २१ ते २७ ऑगस्ट कालावधीत घोरपडीतील सोपानबाग ला-क्रेस्ता सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी ७८ वर्षीय जेष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोळक्याने थांबून कारवाई करणे भोवले, वाहतूक पोलिसांना दंडाची शिक्षा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक घोरपडी परिसरातील ला-क्रेस्ता सोसायटीत राहायला आहेत. २१ ते २७ ऑगस्ट कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटातील ५ लाख ८७ हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेष्ठाने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करीत आहेत.

सायबर चोरट्यांकडून ९ लाखांची फसवणूक

पुणे- गुगल रिव्ह्यूच्या नावाखाली सायबर चोरट्याने एकाला तब्बल ८ लाख ९१ हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १९ ते २७ मे कालावधीत येरवडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४३ वर्षीय नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे येरवडा परिसरात राहायला असून, १९ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. मोबाइलवर लिंक पाठवून त्यांना गुगल रिव्ह्यूच्या नावाने बँकखात्याचे डिटेल्स शेअर केले. त्यावर तक्रारदारांना रक्कम पाठविण्यास भाग पाडून ऑनलाईनरित्या फसवणूक केली आहे. जवळपास ९ लाखांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×