Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पत्रकारांच्या पीएफ आणि पेन्शनची प्रकरणे त्वरीत मार्गी लावणार

पत्रकारांच्या पीएफ आणि पेन्शनची प्रकरणे त्वरीत मार्गी लावणार

आयुक्त अमित वसिष्ट यांचे आश्वासन

marathinews24.com

पुणे – पत्रकारांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि निवृत्ती वेतन (पेन्शन) संदर्भातील प्रलंबित प्रश्‍नांवर त्वरीत लक्ष घालून संबंधित प्रकरणे लवकरात लवकर सोडविण्याचे आश्‍वासन पुणे विभागाचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वसिष्ट यांनी दिले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या शिष्टमंडळांने शुक्रवारी (ता.२२) अमित वसिष्ट यांची भेट घेतली. पत्रकारांच्या संघटनेमार्फत पहिल्यांदाच भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

श्री अग्रसेन ट्रस्ट अध्यक्षाची निवड; विकास गर्ग यांची अध्यक्षपदी निवड – सविस्तर बातमी  

भेटी दरम्यान, भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) सुरज पाटील, भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) सुदर्शन भालाधरे , भविष्य निर्वाह निधी आयुक्त (टू) दुर्गेश कुमार उपस्थित होते. भेटीचे नियोजन पत्रकार प्रसाद पाठक यांनी केले होते. पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलिप तायडे आणि संघ पदाधिकाऱ्यांनी अमित वसिष्ट यांना स्मृतिचिन्ह आणि अभिजात मराठी भाषेवर आधारित पत्रकार संघांची, ‘वृत्तभाषा’ ही स्मरणिका भेट दिली.

पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाच्यावतीने आयुक्तांना पत्रकारांना पीएफ आणि पेन्शन संदर्भात भेडसावणाऱ्या अडचणी सदर्भातील माहिती देण्यात आली. तसेच पीएफ आणि पेन्शन संदर्भातील अडचणी सोडविण्याची विनंती भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना केली. अमित वसिष्ट यांनी पत्रकारांच्या अडचणीं समजून घेतल्या. समस्या सोडविण्यासाठी समन्वयक नेमण्यात येईल. त्याद्वारे तांत्रिक बाबींची पूर्तता करून पत्रकारांची पीएफ आणि पेन्शन संदर्भातील प्रकरणे मार्गी लावण्यात येईल असे आश्‍वासन दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×