Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

श्री अग्रसेन ट्रस्ट अध्यक्षाची निवड; विकास गर्ग यांची अध्यक्षपदी निवड

श्री अग्रसेन ट्रस्ट अध्यक्षाची निवड; विकास गर्ग यांची अध्यक्षपदी निवड

३१ मार्च २०२८ पर्यंत कार्यभार पाहणारी नवीन कार्यकारिणी जाहीर

marathinews24.com

पुणे – श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्या अध्यक्षपदी विकास टी. गर्ग यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच ३१ मार्च २०२८ पर्यंत कार्यभार पाहणारी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. १८ ऑगस्टला झालेल्या सर्वसाधारण सभेत पंच कमिटीचे सदस्य कृष्णकुमार गोयल, वेदप्रकाश गुप्ता व रामअवतार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. पंच कमिटीच्या वतीने कृष्णकुमार गोयल यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. त्यांना माववळे अध्यक्ष सुनील अग्रवाल व सतपाल मित्तल यांचा सहकार्य लाभला.

कृषी योजनांची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी  

नवीन कार्यकारिणीत अशोक आर. अग्रवाल, प्रवीण एन. अग्रवाल, आशीष प्रेम गर्ग, रमेश कश्मीरीलाल अग्रवाल, मोहन गर्ग, जगमोहन अग्रवाल, विकास टी. गर्ग, राजेश मामनचंद अग्रवाल, धर्मेंद्र अग्रवाल, महावीर मनोहरलाल बंसल, दिनेश रामगोपाल अग्रवाल, विनोद बालकिशन मित्तल, नरेश हुकुमचंद गुप्ता, पवन अग्रवाल व लाजपत मित्तल यांचा समावेश आहे. गुरुवार, २१ ऑगस्टला चिंचवड प्राधिकरण येथील श्री अग्रसेन भवनात नव्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

बैठकीत झालेल्या मतदानाच्या निकालानुसार विकास टी. गर्ग यांची ९०० हून अधिक सभासद असलेल्या श्री अग्रसेन ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच एखाद्या युवा सदस्याची अध्यक्षपदी निवड झाली असून विकास गर्ग हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. समाजासाठी ही एक मोठी कामगिरी मानली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×