Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड

प्रतिस्पर्धी टोळीकडून पोलीस वाहनाचा पाठलाग

marathinews24.com

पुणे – कुख्यात बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीत वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले असताना न्यायालयात नेत असताना कृष्णा आंदेकर, त्याचे भाच्यांवर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आले आहे. पोलीस वाहनाचा पाठलाग करुन आंदेकर, त्याच्या भाच्यांवर गोळीबार करण्याचा कट सोमनाथ गायकवाड याचा साथीदार सूरज ठोंबरे याने रचल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सूरज ठोंबरे याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वैमनस्यातून भावंडांवर हल्ला; खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

सूरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले (वय २४), वेदांत रोहित सावंत (वय २१), धीरज लखारा ( तिघे रा. धनकवडी), अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, रा. गुजरवाडी, कात्रज) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गु्न्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वर्चस्वाच्या वादातून दोन वर्षांपूूवी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा नाना पेठेतील डोके तालमीजवळ सोमनाथ गायकवाड टोळीतील सराइतांनी खून केला होता. वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड उगविण्यासाठी आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरुन आयुष कोमकर, गणेश काळे यांचे खून करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी पुणे-सातारा रस्त्यावर अक्षय काळे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. आंदेकरसह साथीदारांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर हे नंदूरबार कारागृहात आहे. कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर, त्याचा भाऊ तुषार यांना न्यायालयाीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालायत आणण्यात आले होते.

नंदूरबार कारागृह ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान पोलीस वाहनातून त्यांना आणण्यात आले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा नंदूरबार कारागृहात पाठविण्यात येणार होते. सोमनाथ गायकवाड यााचा जवळचा साथीदार सूरज ठोंबरे याने आंदेकर, वाडेकर यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. मानव ढमाले याच्या सांगण्यावरुन साथीदार वेदांत सावंत, धीरज लखारा, अथर्व खोपडे यांनी शिवाजीनगर ते चाकणपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करुन पोलीस वाहनावर हल्ला करुन आंदेकर, वाडेकर यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींना हल्ला करण्यासाठी पिस्तुल पुररविल्याचे तपासात उघड झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे या प्रकरणाचा तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×