Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्ज लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना

मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्ज लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना

योजना 31 मार्च 2026 पर्यत राबविण्यात येणार

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांनी कळविले आहे.

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ७ दिवस परवानगी – सविस्तर योजना 

या योजनेनुसार ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी परतावा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी भरणा परतावा OTS योजना 31 मार्च 2026 पर्यत राबविण्यात येणार आहे. तरी महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीना या योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करावेत

पुणे – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत एकूण 24 मागासवर्गीय मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये 14 मुलांची व 10 मुलींची वसतिगृहे आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण 13 शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलींची 4 व मुलांची 8 वसतिगृहे आहेत. तसेच 12 वसतिगृहे तालुकास्तरावर आहेत.

समाज कल्याण आयुक्त यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता व्यावसायिक विभागाचे मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे. शासकीय वसतिगृह प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार असून https://hmas.mahait.org पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अर्ज करावयाचे आहेत. 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावयाची मुदत असून 18 सप्टेंबर 2025 रोजी प्रवेशाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तरी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश योजनेचा लाभ घ्यावा, असेही सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×