Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ७ दिवस परवानगी

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ७ दिवस परवानगी

जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांला ध्वनी प्रदुषण संबंधी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी

marathinews24.com

पुणे – राज्यशासनाने गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केला आहे.

‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’ – सविस्तर बातमी 

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या ३१ जानेवारी २०२५ रोजीच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार गणेशोत्सवासाठी शनिवार ३० ऑगस्ट, रविवार ३१ ऑगस्ट, सोमवार १ सप्टेंबर, मंगळवार २ सप्टेंबर, बुधवार ३ सप्टेंबर, गुरुवार ४ सप्टेंबर, शनिवार ६ सप्टेंबर या एकूण ७ दिवसांच्या कालावधीत सदर निर्बंधांना सूट देण्यात आली आहे. याशिवाय नवरात्री उत्सवासाठी बुधवार १ ऑक्टोबर व गुरुवार २ ऑक्टोबर, ख्रिसमससाठी गुरुवार २५ डिसेंबर आणि वर्षाअखेरसाठी बुधवार ३१ डिसेंबर रोजीही या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी देण्याच्या अनुषंगाने एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

ध्वनी प्रदुषण नियम २००० मधील नियम ३ व ४ व ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) चे पालन करण्यात यावे, झोनिंग प्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×