Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

मायेच्या स्वामी मॅडम! अनंतात विलीन…

विद्यानिकेतन हायस्कूलच्या मायेच्या मॅडम अनंतात विलीन

marathinews24.com

पुणे – विद्यार्थी प्रिय असलेल्या श्रीमती रेखा बसवराज स्वामी मॅडम या नुकत्याच अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांनी विद्यार्थी नव्हे तर पिढी घडवली आहे. विद्यानिकेतन हायस्कूल, साखर पेठ, सोलापूर (21/22, साखर पेठ रोड, गणेश पेठ, सोलापूर ४१३००५) याठिकाणी त्या शिक्षिका होत्या. त्यांनी २०१० साली सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतरही त्यांनी समाजसेवा सुरूच ठेवली होती. शांत, सुंदर आणि संयमी स्वभावाच्या या मराठी शिक्षिका भूगोल किंवा इतिहास शिकवताना कविता व कथांचे भावपूर्ण कथन करायच्या. सुपारी खाण्याची त्यांची आवड विद्यार्थ्यांच्या स्मृतीत अजरामर राहिली. पाचवीपासून मराठी विषय शिकवताना त्यांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि शिस्त अनेक पिढ्यांना लाभली.

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांच्या निधनाने स्त्री शक्तीची मोठी हानी – सविस्तर बातमी

वर्गात भयंकर गोंधळ असतानाही त्या क्षमाशील राहून शिकवत असत. सर्व मुलांच्या आवडत्या शिक्षिका म्हणून त्यांचा सौम्य आवाज आणि अभिव्यक्तीपूर्ण शैली विद्यार्थ्यांना साहित्यप्रेमात रमवायला शिकवत असे. परीक्षेच्या वेळी स्टाफ रूममधून पेपरांचा गठ्ठा घेऊन वर्गात येणाऱ्या मॅडमसाठी “कॉपीबहाद्दर” विद्यार्थ्यांना हायस वाटायचं. त्या केवळ अध्यापिका नव्हत्या तर मायेची मूर्ती आणि एकमेव देवदूत होत्या.

अविस्मरणीय आठवण

६ वी डी मधील शनिवारी सकाळी सुटण्याच्या वेळी त्यांनी कवितेचा सारांश तोंडपाठ करण्यास सांगितला. मी न पाठ केल्याने छडी घेऊन उलट्या हातावर मारल्या सारखे केले. दुसऱ्या दिवशी मी तोंडपाठ म्हणून दाखवला. त्यांच्या डोळ्यात समाधानाचे पाणी तरळत होते. मी निष्पापपणे विचारले, “का हो मॅडम, इतर वेळी तर तुमच्या नयनात पाणी असतंच, पण हे वेगळे आहे.” त्या बोलल्या नाहीत, फक्त डोक्यावरून हात फिरवला. तो मायेचा स्पर्श आणि गुरुशिष्य प्रेमाने हृदय भरून गेले. छडी उचलणे त्यांना नाईलाजाने करावे लागले.

दुःखद विदाई आणि अमर वारसा

प्रिय शिक्षिका मॅडम आता आपल्यात नाहीत. त्यांचे निधनाने मन व्यथित झाले. शिस्त, संस्कार, ज्ञान आणि मायेचा वसा देणाऱ्या या गुरूमाऊलींनी अनेक पिढ्यांचे जीवन घडवले. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो व कुटुंबीयांना बळ द्यो. मॅडमांच्या संयम, क्षमा आणि प्रेमाने शिष्यांच्या जीवनात ज्ञानप्रकाश उजळला. सोलापूर शहरातील सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेतही त्यांचे योगदान अमर आहे. अशा गुरू माउलींमुळे शिक्षणाचे खरे स्वरूप समजते.

लेखक – प्रा. डॉ. दिनेश भगवान हंचाटे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×