Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Maharashtra Council Election : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ ; मतदान प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

Maharashtra Council Election : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ ; मतदान प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सर्वांनी दक्ष राहून पार पाडावी – तुषार ठोंबरे

marathinews24.com

पुणे – Maharashtra Council Election : महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय मतदान होणे महत्त्वाचे असून, ही जबाबदारी प्रत्येक निवडणूक अधिकारी,कर्मचाऱ्याने दक्षतेने पार पाडावी, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सह आयुक्त तुषार ठोंबरे यांनी केले.

माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे, मतपत्रिकेचा वापर, मतदारांची ओळख पडताळणी आणि निवडणुकविषयक नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. Maharashtra Council Election मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये, मतदान साहित्याची तपासणी, मतदारांच्या ओळखीचे पुरावे, मतदार नोंदवहीतील नोंदी, पसंतीक्रमाने मतदान करण्याची पद्धत तसेच मतपेटी हाताळण्याबाबत श्री. ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचे फरकही स्पष्ट करण्यात आले. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, यासाठी मतदारांना योग्य सूचना देणे, अनधिकृत ओळखपत्रांबाबत सतर्क राहणे, संशयास्पद बाबींची त्वरित नोंद घेणे आणि निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे यावर विशेष भर देण्यात आला. तसेच मतदारांच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे आणि सर्व उमेदवारांना समान वागणूक देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि मतदानानंतर करावयाची कार्यवाही यांचीही माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही करण्यात आले.

यावेळी पाचही जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह पुणे विभागातील उपविभागीय अधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×