Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Sureshbhau Gore Memorial : माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली- डॉ. नीलम गोऱ्हे

Sureshbhau Gore Memorial : माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली- डॉ. नीलम गोऱ्हे

स्मारकासाठी आणि स्थानिक विकासासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये देण्याची घोषणा

marathinews24.com

चाकण – Sureshbhau Gore Memorial : खेड तालुक्याचे माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. स्व. सुरेशभाऊ गोरे यांनी शिक्षण, आरोग्य, स्थानिक विकास आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले. चाकण परिसरातील पोलीस यंत्रणेला अधिक मनुष्यबळ आणि वाहने मिळावीत, यांसारखे महत्त्वाचे प्रश्न आम्ही सभागृहात मांडले होते. जनतेच्या हितासाठी काम करण्याची त्यांची तळमळ आणि विकासासाठीचे योगदान कायम स्मरणात राहील.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान – सविस्तर बातमी 

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व शिवसैनिक कायम चाकण , राजगुरूनगर परिसर व गोरे परिवार यांच्या पाठीशी राहिल अशी ग्वाही नीलमताई गोर्हेंनी दिली ,
राजगुरुनगर आणि खेड परिसरात राजकीय मतभेद असले, तरी मनभेद नाहीत, हे आजच्या कार्यक्रमात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने स्पष्ट होते. Sureshbhau Gore Memorial स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे यासाठी स्व स्व.सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मारकासाठी आणि महिला बचत गट भवन उभारणे आवश्यक आहे, या स्थानिक विकासासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये देण्याची घोषणा डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी यावेळी केली.

अभिवादन करताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजीशेठ काळे, नगराध्यक्ष मनिषा सुरेश गोरे, निर्मलाताई पानसरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, अतुल भाऊ देशमुख सभापती पंचायत समिती, अशोकदादा राक्षे सभापती बाजार समिती, रणजीत भाडे उपसभापती, अंकुश राक्षे, विजया शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, आनंद गोयल पुणे शहर संघटक व अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×