Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

Maharashtra Police Bharti 2025 : पोलीस भरती करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; पोलीस भरतीला हिरवा कंदील…

१५६३१ जागांच्या भरतीचा शासन निर्णय जारी

marathinews24.com

मुंबई – Maharashtra Police Bharti 2025 – राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत महाराष्ट्र पोलिस दलात तब्बल १५६३१ पदांची भरती करण्यास हिरवा कंदील दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, आता त्याबाबतचा गृह विभागानं शासन निर्णय जाहीर केला आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया नेमकी कधी राबवली जाणार, असे तरुणांकडून विचारले जात होते.

असे असतानाच आता सरकारने या भरतीबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानंतर आता पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात असून तरुणांनीही तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आता ऑनलाईन गेम खेळणे बंद होणार..ऑनलाइन जुगार चालवल्यास तीन वर्षाची शिक्षा – सविस्तर बातमी

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पोलीस भरती व्हावी अशी राज्यातील तरुणांकडून मागणी केली जात होती. राज्यभरात हजारो तरुण पोलीस दलात सामील होण्यासाठी पूर्ण ताकतीने अभ्यास व मैदानी चाचणीची तयारी करत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने नुकतेच राज्यात एकूण १५ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याचे जाहीर केले होते. या पदांसाठी भरती प्रक्रिया नेमकी कधी राबवली जाणार, असा प्रश्न तरुणांच्या मनात असतानाच आता सरकारने या भरतीबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानंतर आता पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात असून राज्यातील तरुणांनीही तयारीला लागावे, असे आवाहन केले जात आहे. या निर्णयामुळे आता हजारो तरुणांचे सरकारी नोकरीला लागण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?

पोलीस शिपाई – १२,३९९
पोलीस शिपाई चालक – २३४
बँडस्मन – २५
सशस्त्र पोलीस शिपाई(SRPF) -२३९३
कारागृह पोलीस शिपाई – ५८० अशा एकूण सर्व मिळून – १५६३१ पदांचा समावेश आहे.

राज्य शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ४ मे २०२२ आणि २१ नोव्हेंबर २०२२ च्या राज्य शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन २०२४-२५ ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात आलं आहे.

या भरती प्रकियेसाठीही या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु. ४५० – व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु -३५० इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×