मोलकरणीचा ७ लाखांच्या मंगळसूत्रावर डल्ला

मोलकरणीचा ७ लाखांच्या मंगळसूत्रावर डल्ला

महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरकाम करणार्‍या मोलकरणीने ज्येष्ठ महिलेचे ७ लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला मूळच्या अहिल्यानगरच्या आहेत. त्यांचे भाऊ सनसिटी रस्त्यावरील धनलक्ष्मी सोसायटीत राहायला आहेत.

१८० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून सराईताला पकडले – सविस्तर बातमी 

तक्रारदार जेष्ठ महिला भावाकडे राहण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी त्यांचे मंगळसूत्र टेबलावर ठेवले होते. २० डिसेंबरला त्यांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ज्येष्ठ महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. भावाच्या घरी काम करणार्‍या महिलेने मंगळसूत्र चोरल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×