Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

१८० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून सराईताला पकडले

१८० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून सराईताला पकडले

२ लाख ७० हजारांची वाहने जप्त, वाघोली पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – ट्रॅक्टरसह इतर वाहनांची चोरी करणार्‍या सराईताला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून टॅक्टरसह दुचाकी असा २ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. सराईताला पकडण्यासाठी वाघोली पोलिसांनी तब्बल १८० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा माग काढला. अंबादास विक्रम मिसाळ (वय ४३ , रा.पिंपळनेर, ता.शिरूर, जि.बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दागिने पाॅलीशच्या बतावणीने ज्येष्ठ महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी 

वाघोलीतील पाटील वस्ती परिसरातून ६ डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ट्रॅक्टर चोरून नेला होता. पोलीस अंमलदार अशोक शेळके, गहिनीनाथ बोयणे, साईनाथ रोकडे यांनी वाघोली ते आष्टी बीडपर्यंत तब्बल १८० ठिकाणचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासून आरोपीची शोध घेतला. सराईत अंबादास मिसाळने ट्रॅक्टर चोरल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेउन अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी नूतन पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक मनोज बागल, बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×